सातारा : पानटपरी चालकावर कोडोलीत कोयत्याने वार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2018 01:10 PM2018-10-25T13:10:23+5:302018-10-25T13:11:01+5:30
कोडोली परिसरात पानटपरी व्यवसाय सुरू केल्याच्या कारणावरून तिघांनी पानटपरी चालकावर कोयत्याने वार केल्याची घटना बुधवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास घडली.
सातारा : कोडोली परिसरात पानटपरी व्यवसाय सुरू केल्याच्या कारणावरून तिघांनी पानटपरी चालकावर कोयत्याने वार केल्याची घटना बुधवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास घडली.
याबाबत माहिती अशी की, अरबाज सलीम शेख (वय १८, रा. रघुनाथपुरा पेठ, सातारा) याने भोर फाटा, कोडोलो येथे पानटपरीचा व्यवसाय सुरू केला. याचा राग मनात धरून नितीन जालिंदर माने, मंगेश जालिंदर माने (दोघे रा. शिवराज पेट्रोल पंपाजवळ, सातारा) व आकाश ऊर्फ गुंड्या कापले (रा. कापलेवस्ती, कोडोली) पान टपरीजवळ आले.
त्यांनी तू कोणाला विचारून पानटपरी टाकली. ती आताच्या आता हलव, नाही तर आमच्यासारखे वाईट कोणीही नाही, अशी धमकी दिली. तसेच नितीन याने ्अरबाजच्या हातावर कोयत्याने वार केला. तर मंगेश व आकाश यांनी दांडक्याने मारहाण केली.
यात अरबाज गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.