फाशीचा वडची स्वच्छता करून ‘सातारा क्रांती दिन’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2017 08:36 PM2017-09-08T20:36:47+5:302017-09-08T20:36:47+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : साताºयाच्या इतिहासात ८ सप्टेंबर हा महत्त्वाचा दिवस मानला जातो. १८५७ च्या बंडात सहभाग असणारे साताºयाचे सतरा नरवीर आजच्या दिवशीच शहीद झाले. त्यांच्या स्मृती जतन करण्यासाठी गेंडामाळ येथे फाशीचा वड उभारला आहे. त्यांच्या स्मृती जागविण्यासाठी कला, वाणिज्य महाविद्यालय व जिज्ञासा इतिहास संशोधन व संवर्धन संस्थेच्या वतीने फाशीचा वड येथे शुक्रवारी अभिवादन केले.
क्रांतिकारकांचा जिल्हा म्हणून सातारा जगभर ओळखला जातो. देशावरील प्रत्येक संकटावेळी सातारा जिल्हा धावून आला. १८५७ चा लढा स्वातंत्रसंग्रामातील महत्त्वाचा मानला जातो. यामध्येही साताºयातील सुपुत्र सहभागी झाले होते.या क्रांतिकारकांना अभिवादन करण्यासाठी जमलेल्या विद्यार्थ्यांना १८५७ च्या बंडातील सातारकरांचे योगदान, रगोंबापूजी गुप्तेंनी स्वामी निष्ठेपाई सातारा ते इंग्लंडपर्यंत केलेला चित्तथरारक प्रवास व इंग्लंडमधील त्यांचे कार्य याबद्दल जिज्ञासा इतिहास संशोधन ग्रुपचे नीलेश पंडित यांनी माहिती दिली.
या कार्यक्रमासाठी जिज्ञासा संस्थेचे पदाधिकारी तसेच कला वाणिज्य महाविद्यालयाचे प्रा. डॉ. आर. बी. सातपुते, प्रा. डॉ. भरत जाधव, प्रा. डॉ. संदीप पाटील, प्रा. संदीप पाटील, प्रा. प्रकाश कांबळे, प्रा. युवराज जाधव, सागर गायकवाड, प्रा. गौतम काटकर उपस्थित होते.
प्रशासनाचे दुर्लक्ष
सातारा क्रांती दिनी दरवर्षी जिज्ञासा इतिहास संशोधन क्रांती दिनी विविध उपक्रमांनी अभिवादन केले जाते. परंतु, प्रशासनाचे दरवर्षीच दुर्लक्ष होत आहे. कोणताही प्रतिनिधी तेथे येऊन अभिवादन करत नाही, अशी खंत इतिहास संशोधकांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली.
सातारा येथील फाशीचा वड येथे शुक्रवारी जिज्ञासा इतिहास संशोधन संस्था व कला वाणिज्य महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी अभिवादन केले.