सातारा : बावधनच्या ऐतिहासिक बगाड यात्रेला उत्साहात प्रारंभ, लाखो भाविक दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2018 12:02 PM2018-03-06T12:02:15+5:302018-03-06T12:02:15+5:30
वाई तालुक्यातील बावधन येथील ऐतिहासिक बगाड यात्रेला मंगळवारी सकाळी दहा वाजता उत्साहात प्रारंभ झाला. सोमेश्वर येथील कृष्णातीरी बगड्याला स्नान घालण्यात आले. त्यानंतर कृष्णामाईला ओटी अर्पण करून बगाड्या गणवेश पेहराव घालण्यात आला. यावेळी देवाच्या पालखीलाही स्नान घालण्यात आले.
बावधन (सातारा) : वाई तालुक्यातील बावधन येथील ऐतिहासिक बगाड यात्रेला मंगळवारी सकाळी दहा वाजता उत्साहात प्रारंभ झाला. सोमेश्वर येथील कृष्णातीरी बगड्याला स्नान घालण्यात आले. त्यानंतर कृष्णामाईला ओटी अर्पण करून बगाड्या गणवेश पेहराव घालण्यात आला. यावेळी देवाच्या पालखीलाही स्नान घालण्यात आले.
बावधन येथील काळभैरवनाथ देवाची यात्रा रंगपंचमीला साजरी होते. ऐतिहासिक बगाडामुळे ही रात्र राज्यभर ओळखली जाते. यासाठी सातारा जिल्ह्यासह राज्यभरातून लाखो भाविक दाखल होत असतात. यात्रेचा मंगळवारी मुख्य दिवस असल्याने बगाड मिरवणूक निघाली आहे.
यात्रेनिमित्त सोमवारी रात्री छबिना काढण्यात आला. त्यानंतर पहाटे चार वाजता बगाड व बगाड्याला सोमेश्वर येथे आणण्यात आले. यंदा बगाड्याचा मान मनोज ज्ञानेश्वर सपकाळ यांना मिळाला आहे. बगाड्या मनोज सपकाळ यांना अकरा वाजेपर्यंत बगाडाला वर बांधण्यात येईल. त्यानंतर मिरवणुकीला प्रारंभ होणार आहे.
काळभैरवनाथाच्या नावानं चांगभलंचा गरज करत बगाड मिरवणूक मंदिराच्या दिशेने मार्गक्रमण करेल. ती सूर्यास्तापर्यंत चालणार आहे. यात्रा सुरळीत पार पडावी, यासाठी जिल्हा प्रशासन व पोलिसांनी उपाययोजना केल्या आहेत.