सातारा :  केबलच्या कामासाठी वीज कंपनीला कुलुप, कर्मचाऱ्याला बाहेर काढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2018 02:05 PM2018-04-02T14:05:47+5:302018-04-02T14:12:17+5:30

ट्रान्सफॉर्मरची जळालेल्या केबलचे काम आजच्या आज झाले पाहिजे असे म्हणून वीज कंपनी कार्यालयातून कर्मचाऱ्याला बाहेर काढून दरवाजाला टाळे ठोकण्यात आले. याप्रकरणी दहा जणांच्याविरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. तक्रारीनंतर पोलिसांनी शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा नोंद केला आहे.

Satara: Locked out the power company for the cable work, the employee was taken out | सातारा :  केबलच्या कामासाठी वीज कंपनीला कुलुप, कर्मचाऱ्याला बाहेर काढले

सातारा :  केबलच्या कामासाठी वीज कंपनीला कुलुप, कर्मचाऱ्याला बाहेर काढले

googlenewsNext
ठळक मुद्दे केबलच्या कामासाठी वीज कंपनीला कुलुपकर्मचाऱ्याला बाहेर काढले  शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद

सातारा : ट्रान्सफॉर्मरची जळालेल्या केबलचे काम आजच्या आज झाले पाहिजे असे म्हणून वीज कंपनी कार्यालयातून कर्मचाऱ्याला बाहेर काढून दरवाजाला टाळे ठोकण्यात आले. याप्रकरणी दहा जणांच्याविरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. तक्रारीनंतर पोलिसांनी शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा नोंद केला आहे.


याबाबत माहिती अशी की, कोंडवे, ता. सातारा येथील मायगोल्ड कॉलनीतील ट्रान्सफॉर्मरची केबल जळाली होती. त्यामुळे पटेल (पूर्ण नाव नाही, रा. कोंडवे) व इतर आठ ते नऊजणांनी वीज कंपनीच्या करंजे शाखेतील वीजतंत्री प्रतीक हणमंत गायकवाड (वय २४, रा. शाहूपुरी, सातारा) यांना केबलचे काम आजच झाले पाहिजे म्हणून कार्यालयातून बाहेर काढले.

त्यानंतर कार्यालयाला टाळे ठोकण्यात आले. याप्रकरणी प्रतीक गायकवाड यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. याबाबत पोलीस अधिक तपास करीत आहेत.
 

Web Title: Satara: Locked out the power company for the cable work, the employee was taken out

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.