सातारा लोकसभा मतदारसंघाचे उद्या भविष्य ठरणार, मंगळवारी मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2019 02:40 PM2019-04-22T14:40:25+5:302019-04-22T14:45:21+5:30

सातारा लोकसभा मतदारसंघासाठी मंगळवारी ( दि. २३ ) सकाळी ७ ते सायंकाळी ६ यावेळेत मतदान प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. या निवडणुकीत १८ लाख ३८ हजार ९८७ मतदार ९ जणांचे भविष्य ठरविणार आहेत. गेल्या महिनाभरापासून सुरु असलेल्या लोकसभेचा फैसला मतदारराजा करणार आहे.

Satara Lok Sabha constituency will be tomorrow's tomorrow, polling on Tuesday | सातारा लोकसभा मतदारसंघाचे उद्या भविष्य ठरणार, मंगळवारी मतदान

सातारा लोकसभा मतदारसंघाचे उद्या भविष्य ठरणार, मंगळवारी मतदान

Next
ठळक मुद्देसातारा लोकसभा मतदारसंघाचा उद्या फैसला, मंगळवारी मतदान १८ लाख ३८ हजार ९८७ मतदारांच्या हाती ९ उमेदवारांचे भविष्य

सातारा : सातारा लोकसभा मतदारसंघासाठी मंगळवारी ( दि. २३ ) सकाळी ७ ते सायंकाळी ६ यावेळेत मतदान प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. या निवडणुकीत १८ लाख ३८ हजार ९८७ मतदार ९ जणांचे भविष्य ठरविणार आहेत. गेल्या महिनाभरापासून सुरु असलेल्या लोकसभेचा फैसला मतदारराजा करणार आहे.

पुरुष मतदार ९ लाख ३५ हजार ८७८ इतके आहेत. तर महिला मतदार ९ लाख ३ हजार ९२ इतक्या आहेत. तृतीयपंथी मतदारांची संख्या १७ इतकी आहे. सोमवारी तालुक्यांच्या मुख्यालयातून निवडणूक कर्मचारी २२९६ मतदान केंद्रांवर रवाना झाले. मतदान प्रक्रियेसाठी २ हजार ८७३ कर्मचारी कार्यरत राहणार आहेत.

दिव्यांग मतदार केंद्रामध्ये दिव्यांगांसाठी व्हिलचेअर, घरातून मतदान केंद्रापर्यंत पोहोचण्यासाठी वाहनांची व्यवस्था करण्यात आली आहे. अंध मतदारांसाठी ब्रेल लिपीतील डमी पत्रिका, तसेच भिंग ठेवण्यात आले आहे. सातारा लोकसभा मतदार संघामध्ये आचारसंहिता भंगाचे ४५ गुन्हे दाखल करण्यात आले आहे. त्यामध्ये सर्व सौम्य स्वरुपाचे गुन्हे असून, एकही गंभीर गुन्हा दाखल झाला नाही.

उमेदवारांकडून कारवाई करण्यासारखा गंभीर एकही कृत्य केले नाही. जिल्ह्यातील एकूण ३०१ मतदान केंद्र्रांवर लाईव्ह वेबकास्टिंगच्या माध्यमातून देखरेख ठेवण्यात येणार आहे. यावर जिल्हास्तरावरून नियंत्रण करण्यात येणार आहे. तसेच निवडणूक आयोगाकडून निरीक्षण ठेवण्यात येणार आहे.

निवडणूक आयोगाने घालून दिलेल्या नियमांचे काटेकोर पालन करण्यात येणार आहे. यासाठी जमावबंदी आदेशाची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येणार असून, पाचपेक्षा जास्त लोक जमण्यास सक्त मनाई आहे. तसेच मतदान केंद्रात मोबाईल नेण्यास मनाई करण्यात आली आहे. मतदानाच्या ४८ तास अगोदर इलेक्ट्रॉनिक तसेच सोशल मीडियावर प्रचार करण्यास बंदी आहे.

दरम्यान, गेल्या महिनाभरापासून लोकसभा निवडणुकीचे वातावरण भलतेच तापले होते. आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या. साताऱ्यांत खासदार शरद पवार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण, शिवसेना प्रमुख उध्दव ठाकरे, युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे या दिग्गजांच्या सभा झाल्या. गेल्या महिनाभरापासून राजकीय नेत्यांचे समुद्रमंथन सुरु होते. मंगळवारी मतदार आपला कौल देणार आहेत. २३ मे रोजी हा कौल उघडकीस येणार आहे.


महिलांकडे जबाबदारी

यशवंतनगर, (सोनगीरवाडी) ता. वाई, कोरेगाव, उंब्रज, कºहाड, पाटण आणि शाहूपुरी, सातारा येथील सहा मतदान
केंद्रांची संपूर्ण जबाबदारी महिला सांभाळणार आहेत. याठिकाणी अधिकाऱ्यांपासून कर्मचाऱ्यांपर्यंत सर्वच महिला आहेत.

या उमेदवारांचे भविष्य मतदान यंत्रात

उमेदवाराचे नाव               पक्ष

  1. उदयनराजे भोसले          राष्ट्रवादी
  2. नरेंद्र पाटील                  शिवसेना
  3. पंजाबराव पाटील         बळीराजा शेतकरी
  4. सहदेव ऐवळे               वंचित बहुजन आघाडी
  5. आनंदा थोरवडे             बहुजन समाज पार्टी
  6. दिलीप जगताप            बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी
  7. सागर भिसे                  अपक्ष
  8. शैलेंद्र वीर                    अपक्ष
  9. अभिजित बिचुकले      अपक्ष

Web Title: Satara Lok Sabha constituency will be tomorrow's tomorrow, polling on Tuesday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.