सातारा : राकुसलेवाडीत शॉर्टसर्कीटने पाच घरे खाक, ११ लाख ५७ हजार रुपयांचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2018 03:30 PM2018-03-12T15:30:10+5:302018-03-12T15:30:10+5:30
सातारा तालुक्यातील राकुसलेवाडी (आसनगाव) येथे शॉर्टसर्किटने लागलेल्या आगीत पाच घरे जळून खाक झाली. रविवारी रात्री घडलेल्या या घटनेत संसारोपयोगी साहित्य जळाल्याने तब्बल ११ लाख ५७ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.
शेंद्रे : सातारा तालुक्यातील राकुसलेवाडी (आसनगाव) येथे शॉर्टसर्किटने लागलेल्या आगीत पाच घरे जळून खाक झाली. रविवारी रात्री घडलेल्या या घटनेत संसारोपयोगी साहित्य जळाल्याने तब्बल ११ लाख ५७ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, राकुसलेवाडी येथे रविवारी रात्री ८.३० वाजण्याच्या सुमारास शॉकसर्किट झाला. शॉर्टसर्किटमुळे एका घराला आग लागली. काही क्षणातच या आगीने रौद्ररूप धारण केले.
आग लागल्याचे निदर्शनास येताच शेजारील नागरिक घराबाहेर पडले. नागरिकांनी आग विझविण्याचा अटोकाट प्रयत्न केला. मात्र, आग वाढतच गेली. एकापाठोपाठ एक अशी पाच घरे आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. यापैकी चार घरे आगीत पूर्णपणे जळून खाक झाली.
अजिंक्यतारा कारखान्याच्या अग्निशामक दलाच्या मदतीने ग्रामस्थांनी तब्बल दोन तासांच्या प्रयत्नानंतर ही आग आटोक्यात आणली. या आगीत रत्नमाला आनंदराव मोरे यांच्या घराचे ४ लाख ६६ हजार ५००, नंदा श्रीरंग मोरे यांचे ३ लाख ६५ हजार ५००, अरुण रामचंद्र मोरे यांचे १ लाख ४० हजार ५००, लक्ष्मण यशवंत मोरे यांचे १ लाख ६७ हजार ५०० रुपयांचे तर चंद्रकांत यशवंत मोरे यांचे १ लाख ७ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. गावकामगार तलाठी महेश चव्हाण यांनी पंचनामा करून याबाबतचा अहवाल तहसीलदारांकडे पाठविला आहे.