सातारा : मलकापूर नगराध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2018 06:48 PM2018-12-04T18:48:21+5:302018-12-04T18:53:43+5:30

राज्यातील नवनिर्मित आरमोरी (जि. गडचिरोली), मलकापूर (ता. कराड, जि. सातारा) या नगरपरिषदांच्या नगराध्यक्ष पदाचे आरक्षण तसेच बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष पदाचे फेर आरक्षणाची सोडत आज मंत्रालयात नगर विकास राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांच्या अध्यक्षतेखाली काढण्यात आली.

Satara: Malkapur Municipal Council President post | सातारा : मलकापूर नगराध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर

सातारा : मलकापूर नगराध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर

googlenewsNext
ठळक मुद्देमलकापूर व आरमोरी नगराध्यक्षपदाचे आरक्षण जाहीरसिंदखेडराजा नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष पदाचे फेर आरक्षणाची सोडत

सातारा : राज्यातील नवनिर्मित आरमोरी (जि. गडचिरोली), मलकापूर (ता. कराड, जि. सातारा) या नगरपरिषदांच्या नगराध्यक्ष पदाचे आरक्षण तसेच बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष पदाचे फेर आरक्षणाची सोडत आज मंत्रालयात नगर विकास राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांच्या अध्यक्षतेखाली काढण्यात आली. सातारा जिल्ह्यातील मलकापूर नगरपरिषदेचे नगराध्यक्षपद हे नागरिकांच्या मागास प्रवर्गातील महिलांसाठी राखीव झाले

  आरमोरी व मलकापूर येथे नव्याने नगरपरिषदांची निर्मिती करण्यात आली होती. त्यामुळे येथे नगराध्यक्ष पदासाठी आरक्षणाची सोडत जाहीर करण्यात आली, तर सिंदखेडराजा नगरपरिषदेचे यापूर्वी आरक्षण काढण्यात आले होते. मात्र, काही त्रुटीमुळे ते रद्द करून आज त्याचे फेर आरक्षण जाहीर करण्यात आले.

लोकसंख्येच्या प्रमाणानुसार गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी नगरपरिषद ही अनुसूचित जमातीसाठी राखीव झाली आहे. सिंदखेडराजा नगरपरिषदेचे नगराध्यपद सर्वसाधारण प्रवर्गासाठी आरक्षित झाले आहे.

सोडतीच्या वेळी मलकापूर, आरमोरी व सिंदखेड राजा येथील विविध पक्षाचे प्रतिनिधी उपस्थित होते.

Web Title: Satara: Malkapur Municipal Council President post

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.