मी भावोजींचा खून करून आलोय! निर्घृण हत्येनंतर मेहुण्यानं गाठलं पोलीस स्टेशन

By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2021 02:32 PM2021-10-29T14:32:33+5:302021-10-29T14:33:03+5:30

बहिणीला त्रास देणाऱ्या भावोजीची मेहुण्याकडून निर्घृण हत्या; आरोपी स्वत: पोलीस ठाण्यात हजर

in satara man killed sisters husband reaches karad police station | मी भावोजींचा खून करून आलोय! निर्घृण हत्येनंतर मेहुण्यानं गाठलं पोलीस स्टेशन

मी भावोजींचा खून करून आलोय! निर्घृण हत्येनंतर मेहुण्यानं गाठलं पोलीस स्टेशन

Next

कराड : बहिणीला त्रास देत असल्याच्या कारणावरून मेव्हण्याने २१ वर्षीय भाऊ जीचा खून केल्याची घटना शहरातील वाखाण परिसरात घडली. खुनाच्या घटनेनंतर २६ वर्षीय संशयित मेहुणा स्वत:हून कराड शहर पोलिसात हजर झाला. दरम्यान खून झालेला आणि खून केलेल्यांचे कुटुंब परजिल्ह्यातील असून कराडला ते कामानिमित्त वास्तव्यास असतात. 

पोलिसांकडून मिळालेली प्राथमिक माहिती अशी, वाखाण भागात कामानिमित्त परजिल्ह्यातील काही कुटुंबे वास्तव्यास आहेत. दरम्यान यातीलच एका कुटूंबातील पती आपल्या पत्नीला त्रास देत असल्याचे समोर येत आहे. आपल्या बहिणीला नवरा त्रास देत असल्याचा राग भावाच्या मनात होता. यातूनच गुरूवारी रात्री उशिरा बहिणीला त्रास देणाऱ्या दाजीचा मेहुण्याने गळा आवळत छातीवर दगड मारून खून केला. खुनाच्या घटनेनंतर संशयित स्वत: पोलीस ठाण्यात हजर झाला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील, उपनिरिक्षक अर्जुन चोरगे, सहाय्यक फौजदार संतोष सपाटे यांच्यासह पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. याप्रकरणी कराड शहर पोलिसांत नोंद करण्याचे काम सुरू आहे.

Web Title: in satara man killed sisters husband reaches karad police station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.