सातारा : मांढरदेवच्या खेळांडूची महाराष्ट्र संघात निवड, नांदेड येथील क्रॉसकंटी स्पर्धेत यश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2019 01:30 PM2019-01-01T13:30:34+5:302019-01-01T13:32:03+5:30
पॅनेशिआ इंटरनॅशल स्कूल नांदेड येथे झालेल्या महाराष्ट्र राज्य क्रॉसकंट्ी स्पर्धेत मांढरदेव येथील न्यू इंग्लिश स्कूल व मांढदेव अॅथलेटिक फाउंडेशनच्या खेळांडूनी यश संपादन केले़ या स्पर्धेतून आकांक्षा शेलार, सुशांत जेधे व विशाखा साळुंखे यांची राष्ट्रीय स्पर्धेकरिता महाराष्ट्र संघात निवड झाली.
वाई (सातारा) : पॅनेशिआ इंटरनॅशल स्कूल नांदेड येथे झालेल्या महाराष्ट्र राज्य क्रॉसकंट्ी स्पर्धेत मांढरदेव येथील न्यू इंग्लिश स्कूल व मांढदेव अॅथलेटिक फाउंडेशनच्या खेळांडूनी यश संपादन केले़ या स्पर्धेतून आकांक्षा शेलार, सुशांत जेधे व विशाखा साळुंखे यांची राष्ट्रीय स्पर्धेकरिता महाराष्ट्र संघात निवड झाली.
या स्पर्धेत जिल्ह्याचे प्रतिनिधीत्व करताना अठरा वर्षांखालील मुलाच्या गटात सुशांत जेधे याने सहा किमी अंतर १८ मिनिटे ३६ सेकंदात पार करत प्रथम क्रमांक मिळविला. बाळू पुकळे याने तृतीय क्रमांक मिळवला़ अठरा वर्षांखालील मुलींच्या गटात आकांक्षा शेलार हिने चार किलोमीटर अंतर १३ मिनिटे ४० सेकंदात पूर्ण करत प्रथम तर विशाखा साळुंखे हिने व्दितीय क्रमांक मिळवला़ स्पर्धेत महाराष्ट्रातील तीस जिल्ह्यातील खेळाडूंनी सहभाग नोंदवला.
उत्तर प्रदेशमध्ये येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेकरीता आकांक्षा शेलार, सुशांत जेधे व विशाखा साळुंखे यांची निवड झाली. हे सर्व खेळांडू प्रशिक्षक राजगुरू कोचळे व धोेंडिराम वाडकर यांच्या मार्गदर्शनाखाली मांढरदेव अॅथलेटिक्स फाउंडेशन येथे सराव करतात़