सातारा : महाबळेश्वरच्या आठवडी बाजारात दुचाकी पेटली, विक्रेत्यांसह ग्राहकांची धावपळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2018 07:36 PM2018-02-27T19:36:39+5:302018-02-27T19:36:39+5:30
आठवडी बाजारासाठी महाबळेश्वर येथे आलेल्या टेकवली येथील युवकाच्या दुचाकीने अचानक पेट घेतला. बाजारपेठेत भर दुपारी घडलेल्या या घटनेमुळे विक्रेत्यांसह ग्राहकांची एकच धावपळ उडाली.
महाबळेश्वर : आठवडी बाजारासाठी महाबळेश्वर येथे आलेल्या टेकवली येथील युवकाच्या दुचाकीने अचानक पेट घेतला. बाजारपेठेत भर दुपारी घडलेल्या या घटनेमुळे विक्रेत्यांसह ग्राहकांची एकच धावपळ उडाली.
महाबळेश्वर येथे मंगळवारी आठवडी बाजार भरतो. या बाजारासाठी ग्रामीण भागातील शेकडो विक्रेते व ग्रामस्थ खरेदी विक्रीसाठी येतात. गणेश गायकवाड हा युवकही बाजारानिमीत्त महाबळेश्वरात आला होता. बाजारपेठेत एका हॉटेलच्या बाजूला त्याने आपली दुचाकी उभी केली होती.
दुपारी १.४५ वाजण्याच्या सुमारास अचानक दुचाकीने पेट घेतला. गणेश याने प्रसंगावधान राखत दुचाकी रस्यावर मोकळ्या जागेत आणली. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. हॉटेल मधील पाईपलाईन द्वारे ही आग विजविण्यात आली. दरम्यान, भर दुपारी घडलेल्या या घटनेमुळे ग्राहकांसह सर्वांचीच धावपळ उडाली.