सातारा : मायणी पोलिसांची वाळुतस्कारांविरुद्ध कारवाई, ३३ लाखांचा मुद्देमाल जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2018 01:14 PM2018-12-24T13:14:12+5:302018-12-24T13:16:22+5:30
मायणी येथील ब्रिटिशकालीन तलावाच्या पूर्व भागामध्ये रविवारी रात्री साडेअकराच्या सुमारास वाघबीळ येथे अवैध वाळू उपसा करणा-या वाहनांवर मायणी पोलिसांनी छापा टाकून पाच वाहनांसह ३३ लाख ३८ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
मायणी : येथील ब्रिटिशकालीन तलावाच्या पूर्व भागामध्ये रविवारी रात्री साडेअकराच्या सुमारास वाघबीळ येथे अवैध वाळू उपसा करणा-या वाहनांवर मायणी पोलिसांनी छापा टाकून पाच वाहनांसह ३३ लाख ३८ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
याबाबत अधिक माहिती अशी, मायणी येथील ब्रिटिशकालीन तलावाच्या पूर्व भागात असलेल्या वाघबीळ नावाच्या ठिकाणी अवैधरित्या वाळू उपसा सुरू असलेली माहिती मिळाल्यानंतर पोलीसांनी छापा टाकला. या छाप्यात बुलेरो पिकअप् सह चार वाहने आणि त्यामध्ये भरलेली वाळू असा सुमारे ३३ लाख ३८ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
याप्रकरणी राहुल धनवडे रा.नेवरी ता.कडेगाव,रुपेश शिंदे आंबवडे ता.खटाव,यश भगत रा.विटा ता.खानापुर व अविनाश भगत रा.खानापुर ता.खानापुर असा चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला असुन त्यांना आज न्यायालयामध्ये हजर करण्यांत येणार आहे.
छापा टाकणा-या टीममध्ये मायणी पोलीस दूरक्षेत्राचे सा.पो.नि. संतोष गोसावी यांच्यासह गुलाब दोलताडे , अरुण बुधावले, नवनाथ शिरकुळे ,विठ्ठल पवार ,बापुराव खांडेकर ,नितीन काळे, सुरेश हंगे,प्रताप कोळी व विकास जाधव यांच्या पथकाचा समावेश होता.