साताऱ्यात मांडूळ सापासह दोघेजण ताब्यात, पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2018 01:34 PM2018-03-20T13:34:44+5:302018-03-20T13:34:44+5:30

पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर वाढे फाटा परिसरात रात्री उशिरा सातारा शहर पोलिसांनी मांडूळ या दुर्मीळ जातीचा साप विक्रीसाठी घेऊन जाणाऱ्या दोघांना अटक केली. त्यांच्याकडून साडेतीन लाख रुपयांचा मांडूळ साप जप्त केला.

In the Satara metropolitan magistrate, the city police detained | साताऱ्यात मांडूळ सापासह दोघेजण ताब्यात, पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

साताऱ्यात मांडूळ सापासह दोघेजण ताब्यात, पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

Next
ठळक मुद्देसाताऱ्यात मांडूळ सापासह दोघेजण ताब्यातविक्रीसाठी घेऊन जात होते दुर्मीळ जातीचा साप

सातारा : पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर वाढे फाटा परिसरात रात्री उशिरा सातारा शहर पोलिसांनी मांडूळ या दुर्मीळ जातीचा साप विक्रीसाठी घेऊन जाणाऱ्या दोघांना अटक केली. त्यांच्याकडून साडेतीन लाख रुपयांचा मांडूळ साप जप्त केला.

याबाबत माहिती अशी की, सहायक पोलीस निरीक्षक चेतन मचले यांच्या पथकाने वाढे फाटा येथे सापळा रचला. त्यावेळी वाढे फाटा परिसरात दोन तरुण दुचाकीवरून एका पोत्यात मांडूळ घेऊन जात होते. त्यांना पथकाने शिताफीने पकडून त्यांच्याकडून साडेतीन लाख रुपये किमतीचा मांडूळ हा साप जप्त केला. तसेच दोघांना ताब्यात घेतले. त्यापैकी एक अल्पवयीन आहे.

याप्रकरणी सातारा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, कुणाल सतीश पाटोळे (रा. खंडोबाचा माळ, सातारा) याला अटक केली आहे. या कारवाईत पोलीस नाईक राहुल खाडे, झोपळे, अनिल स्वामी यांचा सहभाग होता. पोलीस उपनिरीक्षक वंजारी तपास करीत आहेत.

Web Title: In the Satara metropolitan magistrate, the city police detained

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.