सातारा : किमान तापमान १८ पर्यंत पोहोचले, दिवसात चार अंशांनी वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2018 05:25 PM2018-02-15T17:25:23+5:302018-02-15T17:35:32+5:30
सातारा जिल्ह्यातील किमान तापमानात एका दिवसातच चार अंशाने वाढ झाली असून, ते १८ अंशापर्यंत पोहोचले आहे. तर दुसरीकडे कमाल तापमान ३१ अंशाच्या दरम्यान असून, जिल्ह्यात थंडी हळूहळू कमी होऊ लागली आहे.
सातारा : जिल्ह्यातील किमान तापमानात एका दिवसातच चार अंशाने वाढ झाली असून, ते १८ अंशापर्यंत पोहोचले आहे. तर दुसरीकडे कमाल तापमान ३१ अंशाच्या दरम्यान असून, जिल्ह्यात थंडी हळूहळू कमी होऊ लागली आहे.
जिल्ह्यात गेल्या तीन महिन्यांपासून थंडी जाणवत आहे. गेल्यावर्षी डिसेंबर महिन्यात प्रथमच दोन वर्षांतील निचांकी तापमानाची नोंद झाली होती. तर या हिवाळा ऋतूत दोनवेळा किमान तापमान ९ अंशापर्यंत खाली आले होते. त्या तुलनेत कमाल तापमान ३० अंशाच्या आसपास स्थिर असल्याचे दिसून आले.
गेल्या चार दिवसांपासून किमान तापमान १२ ते १४ अंशाच्या दरम्यान होते. मात्र, आता त्यामध्ये वाढ झाली आहे. एका दिवसातच किमान तापमानात ४ अंशाची वाढ झाली आहे. दि. १४ रोजी १४.०८ तापमान होते तर गुरुवार, दि. १५ रोजी किमान तापमान १८.०३ अंशापर्यंत पोहोचले. त्यामुळे थंडीची तीव्रता कमी झाल्याचे दिसून आले.
तापमान किमान कमाल अंशामध्ये
दि. ११ १४ ३२
दि. १२ १४.०५ ३०
दि. १३ १४.०१ ३१.०६
दि. १४ १४.०८ ३२
दि. १५ १८.०३ ...