Satara: कोयना परिसरात भूकंपाचा साैम्य धक्का, २.९ रिश्चर स्केलची नोंद : १२ दिवसांत दुसऱ्यांदा जाणवला 

By नितीन काळेल | Published: October 28, 2023 11:11 PM2023-10-28T23:11:26+5:302023-10-28T23:13:02+5:30

Satara News: पाटण तालुक्यातील कोयना धरण परिसरात शनिवारी रात्रीच्या सुमारास भूकंपाचा साैम्य धक्का जाणवला. २.९ रिश्चर स्केलचा हा धक्का होता. तर १६ आॅक्टोबरनंतर जाणवलेला भूकंपाचा हा दुसरा धक्का ठरला आहे.

Satara: Moderate earthquake, 2.9 magnitude recorded in Koyna area : Second felt in 12 days | Satara: कोयना परिसरात भूकंपाचा साैम्य धक्का, २.९ रिश्चर स्केलची नोंद : १२ दिवसांत दुसऱ्यांदा जाणवला 

Satara: कोयना परिसरात भूकंपाचा साैम्य धक्का, २.९ रिश्चर स्केलची नोंद : १२ दिवसांत दुसऱ्यांदा जाणवला 

- नितीन काळेल 
सातारा : पाटण तालुक्यातील कोयना धरण परिसरात शनिवारी रात्रीच्या सुमारास भूकंपाचा साैम्य धक्का जाणवला. २.९ रिश्चर स्केलचा हा धक्का होता. तर १६ आॅक्टोबरनंतर जाणवलेला भूकंपाचा हा दुसरा धक्का ठरला आहे.

कोयना धरण परिसरात वारंवार भूकंपाचे धक्के जाणवतात. याची नोंद भूकंपमापकावर होत असते. शनिवारी रात्रीही ९ वाजून ४ मिनीटांनी कोयनानगर परिसरात भूकंपाचा साैम्य धक्का जाणवला. प्राथमिक माहितीनुसार २.९ रिश्चर स्कूलचा हा धक्का होता. याबाबत भूकंपमापकावर नोंद झाली आहे. तर यापूर्वी १६ आॅक्टोबरला रात्री ११ वाजून ३७ मिनीटांनीही कोयना परिसरात ३.२ रिश्चर स्केलचा भूकंपाचा धक्का जाणवलेला. हा धक्का साैम्य प्रकाराचा होता. कोयना धरणापासून भूकंपाचा केंद्रबिंदू २४ किलोमीटर दूरवर वारणा खोऱ्यातील चांदोली गावच्या पूर्वेस होता. कोयना धरण परिसरातच हा धक्का जाणवलेला. तर याची खोली १७ किलोमीटर होती.
 

Web Title: Satara: Moderate earthquake, 2.9 magnitude recorded in Koyna area : Second felt in 12 days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.