Satara: पावसाळा संपला; सातारा जिल्ह्यात गतवर्षीच्या दुप्पट बरसला, यंदा १२७ टक्के पाऊस

By नितीन काळेल | Published: October 1, 2024 08:32 PM2024-10-01T20:32:15+5:302024-10-01T20:34:12+5:30

Satara News: सातारा जिल्ह्यात गतवर्षीचा दुष्काळ संपवत यंदा वरुणराजाने विक्रम करत गतवर्षीच्या दुप्पट हजेरी लावली. त्यामुळे पावसाळ्यातील चार महिन्यात सरासरीच्या १ हजार १२४ मिलिमीटर पाऊस झाला. तसेच यंदा १२७ टक्के पर्जन्यमान झाले असून यामध्ये दुष्काळी तालुके आबादानी झाले आहेत.

Satara: Monsoon over; Satara district received double the rainfall of last year, this year 127 percent rainfall | Satara: पावसाळा संपला; सातारा जिल्ह्यात गतवर्षीच्या दुप्पट बरसला, यंदा १२७ टक्के पाऊस

Satara: पावसाळा संपला; सातारा जिल्ह्यात गतवर्षीच्या दुप्पट बरसला, यंदा १२७ टक्के पाऊस

- नितीन काळेल 
सातारा - जिल्ह्यात गतवर्षीचा दुष्काळ संपवत यंदा वरुणराजाने विक्रम करत गतवर्षीच्या दुप्पट हजेरी लावली. त्यामुळे पावसाळ्यातील चार महिन्यात सरासरीच्या १ हजार १२४ मिलिमीटर पाऊस झाला. तसेच यंदा १२७ टक्के पर्जन्यमान झाले असून यामध्ये दुष्काळी तालुके आबादानी झाले आहेत.

जिल्ह्यात जून ते सप्टेंबर दरम्यान मान्सूनचा पाऊस पडतो. या चार महिन्यातील पावसावरच वर्षभराचे गणित अवलंबून असते. पण, गेल्यावर्षी अपुरा पाऊस झालेला. त्यामुळे दुष्काळी स्थिती उद्भवली होती. मात्र, यावर्षी जून महिन्यापासूनच जिल्ह्यात धुवाॅधार पाऊस सुरू झाला. त्यामुळे मागील चार महिन्यातील पावसाने रेकाॅर्ड ब्रेक केला आहे. आता पावसाळा संपला असून यंदा गतवर्षीच्या दुप्पट पाऊस पडला आहे. यामध्ये पाटण तालुक्यात १०० टक्क्याला थोडास कमी पाऊस झाला. तर महाबळेश्वरला सरासरीच्या सुमारे ७२ टक्केच पर्जन्यमान नोंद झाले. तर जिल्ह्यातील इतर सर्वच तालुक्यात सरासरीच्या १०० टक्क्यांहून अधिक पाऊस झालेला आहे. 

 
जिल्ह्याची वार्षिक सरासरी ८८६.२ मिलिमीटर
यंदा पाऊस झाला १,१२४ मिलिमीटर
यंदाची टक्केवारी १२६.८

 तालुकानिहाय झालेला पाऊस आणि टक्केवारी
सातारा १,०५८.८          १३९
जावळी १,९९३.२          १४९.३
पाटण १,६०२.९            ९९.५
कऱ्हाड ९८४.२             १६७.५
कोरेगाव ८८०.१             १४०.७
खटाव ६८४.२                १७०.९
माण ५११.२                    १२१.६
फलटण ५५४.८             १४८.४
खंडाळा ५६९.३             १४३.७
वाई १,०१९.८                 १४४.४
महाबळेश्वर ३,८९४.३      ७१.६ 

मागील वर्षी सरासरी ६५ टक्के पर्जन्यमान 
जिल्ह्यातील मागीलवर्षी पर्जन्यमान कमी होते. वार्षिक सरासरीच्या ६५.२ टक्के म्हणजे ५७८ मिलिमीटरची नोंद झाली होती. यामध्ये सर्वच तालुक्यात कमी पाऊस झालेला. सातारा आणि जावळी तालुक्यात ७५ टक्के, पाटणला ६४, कऱ्हाड ५६, कारेगाव ४८, खटाव ६८, माणमध्ये ६१, फलटणला ४९, खंडाळा तालुक्यात ५२, वाई ६३ तर महाबळेश्वर तालुक्यात ५३ टक्के पाऊस झाला होता.

Web Title: Satara: Monsoon over; Satara district received double the rainfall of last year, this year 127 percent rainfall

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.