घंटागाडीच्या संपावर सातारा पालिकेचा उतारा !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2017 02:20 PM2017-09-29T14:20:18+5:302017-09-29T14:21:51+5:30
नगर पालिकेच्या ई-टेंडर प्रणालीला विरोध दर्शवित घंटागाडी संघटनेच्या कर्मचाºयांनी पालिकेत उपोषण सुरू केले आहे. असे असुनही उपोषणाच्या दुसºया दिवशी शुक्रवारी (दि. २९) पालिकेच्या वतीने शहरातील सर्व कचरा उचलण्यात आला.
सातारा : नगर पालिकेच्या ई-टेंडर प्रणालीला विरोध दर्शवित घंटागाडी संघटनेच्या कर्मचाºयांनी पालिकेत उपोषण सुरू केले आहे. असे असुनही उपोषणाच्या दुसºया दिवशी शुक्रवारी (दि. २९) पालिकेच्या वतीने शहरातील सर्व कचरा उचलण्यात आला. रोजंदारीवर काम करणारे ४० कर्मचारी, चार ट्रॅक्टर, एक कॉम्पॅक्टर आणि दोन टीपरच्या माध्यमातून आरोग्य विभागाने तब्बल ६० टन कचरा गोळा करून त्याची विल्हेवाट लावली.
सातारा शहरातील चाळीस वार्डातून ४२ घंटागाड्यांच्या माध्यमातून कचरा गोळा केला जातो. दिवसभरात तब्बल ७० ते ७५ टन कचरा गोळा करून त्याची सोनगाव कचरा डेपोत विल्हेवाट लावली जाते. दरम्यान, पालिका प्रशासनाच्या वतीने घंटागाडीसाठी नव्याने राबविण्यात येणाºया ई-टेंडर पद्धतीला अखिल महाराष्ट्र कामगार कर्मचारी संघाने विरोध दर्शविला असून हा निर्णय रद्द करण्यात यावा, या मागणीसाठी संघटनेच्या वतीने गुरुवारपासून (दि. २८) पालिकेत उपोषण सुरू केले आहे.
शुक्रवारी उपोषणाचा दुसरा दिवस असल्याने व सर्वच घंटागाड्यांची चाके थांबल्याने शहरात साचणारा कचरा उचलणार कोण? असा प्रश्न निर्माण झाला होता. मात्र, पालिकेच्या आरोग्य विभागाने तातडीने यावर तोडगा काढून शहराची झाडून स्वच्छता केली.
रोजंदारीवर काम करणारे ४० कर्मचारी, चार ट्रॅक्टर, १ कॉम्पॅक्टर आणि दोन टीपरच्या माध्यमातून आरोग्य विभागाने शहरातील जागो-जोगी साचलेला कचरा गोळा करून त्याची सोनगाव डेपोत विल्हेवाट लावली. दिवसभरात तब्बल ६० टन कचरा गोळा करण्यात आला.
७० कचरा वेचकांची मदत
सोनगाव कचरा डेपोत साचणाºया कचºयातून प्लास्टिक, लोखंड व इतर भंगाराचे साहित्य गोळा केले जाते. जवळपास ७० कचरा वेचक हे काम करून आपला उदरनिवार्ह चालवितात. शुक्रवारी आरोग्य विभागाच्या वतीने या सर्व कचरा वेचकांची मदत घेऊन शहरातील कचरा गोळा करण्यात आला.