सातारा  पालिका कर्मचाऱ्यांनाहजमत सुटचे कवच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2020 02:10 PM2020-04-16T14:10:19+5:302020-04-16T14:11:54+5:30

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पालिकेची आरोग्य यंत्रणा सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. शहरात धूर व जंतुनाशक औषध फवारणी करण्याबरोबरच नागरिकांमध्ये कोरोनाबाबत प्रबोधनही केले जात आहे.

Satara Municipality employees wear suits | सातारा  पालिका कर्मचाऱ्यांनाहजमत सुटचे कवच

सातारा  पालिका कर्मचाऱ्यांनाहजमत सुटचे कवच

googlenewsNext
ठळक मुद्देसुरक्षेच्या दृष्टीने पाऊल : शासनाकडून २५ पीपीई कीट ही प्राप्त

सातारा : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सातारा पालिकेकडून कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी ५० हजमत सूट खरेदी करण्यात आले आहेत. कोरोना संशयीत रुग्ण असोत किंवा होम क्वारंटाईन केलेले नागरिक संबंधित व्यक्तीच्या संपर्कात येणाºया कर्मचाºयांसाठी हे सुट ह्यसुरक्षा कवचह्ण म्हणून काम करणार आहेत. याशिवाय शासनाकडूनही पालिकेला २५ पीपीई कीट देण्यात आले आहेत.

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पालिकेची आरोग्य यंत्रणा सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. शहरात धूर व जंतुनाशक औषध फवारणी करण्याबरोबरच नागरिकांमध्ये कोरोनाबाबत प्रबोधनही केले जात आहे. नागरिकांसह कर्मचाºयांची सुरक्षा अबाधित राहावी यासाठी पालिकेकडून प्रयत्न सुरू आहेत. ही सुरक्षा अधिक सक्षम व्हावी यासाठी पालिकेकडून नुकतेच ५० हजमत सूट खरेदी करण्यात आले आहेत.

कोरोनाग्रस्त, संशयित व्यक्ती अथवा क्वारंटाईन केलेल्या नागरिकांशी संपर्क येणाºया पालिकेतील आरोग्य सेवकांना हे सूट सुरक्षा कवच म्हणून परिणामकारक ठरणार आहेत. हजमत सूट हे हजार्ड मटेरियल पोशाखाचे संक्षिप्त नाव आहे. या पोशाखाने संपूर्ण शरीर झाकता येथे. हा सूट घातक पदार्थ, रसायने आणि जैविक धोकादायक गोष्टी यांपासून संरक्षण करतो. हा सूट तयार करताना व्हायरस अथवा धोकादायक पदार्थ यात शिरकाव करणार नाही, याची काळजी घेतली जाते.

काही दिवसांपूर्वी साताºयात एका रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झाला. संगम माहुली येथील स्मशानभूमीत त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी पीपीई कीट नसल्याने अनेक अडचणी निर्माण झाल्या. या अडचणी लक्षात घेता शासनाच्या वतीने पालिकेला २५ पीपीई कीट देखील तातडीने उपलब्ध करण्यात आले आहेत.

 

कोणाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पालिकेची संपूर्ण यंत्रणा अहोरात्र झटत आहे. नागरिकांनी शासन नियमांचे पालन करावे. संचार बंदीच्या काळात घराबाहेर पडू नये. पालिकेच्या माध्यमातून नागरिकांना सर्व जीवनावश्यक वस्तू घरपोच केल्या जात आहेत. त्यामुळे नागरिकांनी स्वत:सह इतरांच्या सुरक्षेची काळजी घ्यावी.
- शंकर गोरे, मुख्याधिकारी

Web Title: Satara Municipality employees wear suits

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.