सातारा नगरपंचायतीत नगराध्यक्ष पदांसाठी राहणार चढाओढ
By admin | Published: October 19, 2016 11:43 PM2016-10-19T23:43:31+5:302016-10-19T23:43:31+5:30
नगरपंचायतचे प्रथम नागरिक होण्याची सुप्त इच्छा अनेक जणांना आहे.
उंब्रज : नेहमीपेक्षा यंदा चांगला पाऊस झाला... नदी, नाले, ओढे भरून वाहत होते... कऱ्हाड तालुक्यातील सांबरवाडी तलावही काठोकाठ भरला; पण तलावाला लागलेल्या गळतीमुळे काही दिवसांत तो रिकामा झाला. शेतकऱ्यांच्या डोळ्यादेखत पाणी वाहून गेले; पण प्रशासनाने डोळ्यावर पट्टी बांधल्याने चिमण्यांची तहान भागेल एवढेही पाणी राहिलेले नाही. यामुळे संताप व्यक्त होत आहे.
सांबरवाडी येथील तलावाच्या बंधाऱ्याला गळती लागली होती. यासंदर्भात ‘लोकमत’ने यापूर्वी आवाज उठविला होता. तरीही प्रशासनाने गांभीर्य न घेतल्याने शेतकऱ्यांमधून संताप व्यक्त होत आहे.
येथील शेतकऱ्यांच्या डोळ्यादेखत लाखो लिटर पाणी वाहून जात होते. हे पाणी तातडीने अडवावे, म्हणून येथील शेतकऱ्यांनी लोकप्रतिनिधींकडे धाव घेतली होती. तसेच शासकीय अधिकाऱ्यांना भेटून परिस्थिती सांगितली होती;
पण कोणीच दखल घेतली गेली नाही.
अडलेल्या पाण्याच्या जीवावर विहिरींना पाणी वाढणार आणि बारमाही शेती बागायत होणार हे स्वप्न पाहणाऱ्या येथील शेतकऱ्यांची स्वप्ने गळतीच्या पाण्यातूनच वाहून गेली.
‘सरकारी काम आणि चार महिने थांब,’ अशी म्हण ग्रामीण भागात वापरली जाते; पण आता थांबायचे किती? हा प्रश्न शेतकऱ्यांमधून विचारला जात आहे. कृष्णा नदीपासून सहा ते सात किलोमीटर अंतरावरील हे गाव. कृष्णा नदीकाठची सर्व गावे बागायती. उपसा जलसिंचन योजनेमुळे हा परिसर हिरवागार झालेला. पण, अशा योजनांचा लाभ या गावाला नाही.
हे गाव या योजनते नावापुरते दिसते; पण या योजनेचे पाणी काही वेळेत मिळत नाही. पिके करपून जातात. यामुळे येथील अनेक शेतकऱ्यांनी बागायती शेती बंद केली असल्याचे येथील शेतक ऱ्यांचे म्हणणे आहे. यामुळे हा परिसर जिरायतीच राहिला.
या तलावात पाणी अडले तर सांबरवाडीसह अंधारवाडी, हिंगनोळे, कोरीवळे या गावांच्या बहुतांशी शेतीच्या पाण्याचा प्रश्न निकालात निघू शकतो. यासाठी लोकप्रतिनिधी, शासकीय अधिकारी, सत्ताधारी पक्षांचे पदाधिकारी यांनी या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष दिले तर पुढील वर्षी तरी हा परिसर हिरवागार होऊ शकेल. ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ ही योजना यशस्वी होऊ शकेल. अन्यथा राजकारणातील अडवा आणि जिरवा हे सूत्र वापरून बंधाऱ्याची गळती न काढल्यास या परिसरातील शेतकरी ही योग्य वेळी नक्कीच अडवतील आणि संबंधितांची जिरवतील हे मात्र नक्की. (प्रतिनिधी)
तलावात थोडे पाणी असताना काही अधिकारी तलावाच्या ठिकाणी आले होते. ‘आम्ही आराखडा तयार करतो, लवकरच दुरुस्ती करू,’ असे सांगून गेले. ते त्यांचे इस्टिमेट अन् दुरुस्तीही तिकडेच. परत कोण फिरकलेच नाही. आता तर तलाव कोरडाच झाला आहे; पण पुढील वर्षी पाणीसाठा होण्यासाठी तरी प्रयत्न होणे अपेक्षित आहे. त्यासाठी दुरुस्ती करणे गरजेचे आहे. केवळ कागदी घोडे न नाचवता कृतीची आवश्यकता आहे. तरच पुढील वर्षी तरी पाणी साठा होईल.
- दीपक साबळे, शेतकरी, सांबरवाडी
प्रशासनाचे डोळे कधी उघडणार
पाणी बचतीचा संदेश शासन पातळीवर दिला जात असताना जलसंधारणाच्या कामात ग्रामस्थ झोकून देऊन कामे करत आहेत. सांबळवाडी तलावातील गळतीबद्दल सांगूनही प्रशासन लक्ष देत नाही.