Satara News: बोलत का नाही म्हणून तरुणीला पायरीवर आपटले, साताऱ्यातील घटना, तिघांवर गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2023 08:17 AM2023-04-19T08:17:22+5:302023-04-19T08:17:46+5:30
Satara News: बोलत नाही, याचा राग मनात धरून एका तरुणाने कापड दुकानात मॅनेजर म्हणून काम करत असलेल्या तरुणीला उचलून पायरीवर आपटले. त्यानंतर कपाळावर लोखंडी राॅड मारून तिच्या खुनाचा प्रयत्न केला.
सातारा : बोलत नाही, याचा राग मनात धरून एका तरुणाने कापड दुकानात मॅनेजर म्हणून काम करत असलेल्या तरुणीला उचलून पायरीवर आपटले. त्यानंतर कपाळावर लोखंडी राॅड मारून तिच्या खुनाचा प्रयत्न केला. याप्रकरणी शाहूपुरी पोलिस ठाण्यात तिघांवर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संदेश तुकाराम गिरमे (वय २७, रा. कूस, ता. सातारा) व त्याच्यासोबत असलेला संकेत आणि धनाजी, अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. पीडित तरुणी २३ वर्षांची आहे. ती आणि तिचा मित्र दि. १६ रोजी रात्री १०:३० वाजता एका अपार्टमेंटच्या तळमजल्यामध्ये बोलत थांबले होते. त्यावेळी संदेश गिरमे हा त्याच्या अन्य दोन मित्रांसमवेत तेथे आला. पीडित तरुणीने त्याच्यासोबत बोलणे बंद केले होते. याचा राग मनात धरून त्याने तरुणीला पकडून बाजूला ढकलले. त्यानंतर त्याने पीडितेच्या कानाखाली आणि नाकावर बुक्की मारली. एवढेच नव्हे तर संदेश गिरमे याने तरुणीच्या छातीवर लाथा मारून तिला उचलून पायरीवर आपटले. तिच्या कपाळावर लोखंडी राॅडने मारहाण केली.