सातारा : पश्चिम भागात नॉन स्टॉप १६ दिवस पाऊस, कोयनेने सत्तरी ओलांडली, धरण परिसरात कायम 'जोर'धार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2018 01:42 PM2018-07-16T13:42:11+5:302018-07-16T13:52:32+5:30

साताऱ्यासह जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर आणखी वाढला असून, रविवारपासून धुवाँधार सुरू आहे. त्यामुळे सोमवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत कोयना धरणात ६९.७८ टीमएसी इतका साठा झाला. तर नवजा येथे २७७ आणि महाबळेश्वरला १८९ मिलीमीटर पाऊस झाला. कोयना धरणात सकाळी आठपर्यंत ४५ हजार ८०२ क्युसेक पाण्याची आवक झाली आहे.

Satara: Non-stop in the west part of 16 days, Koyane crossed the sixty-seven, permanently in the dam area | सातारा : पश्चिम भागात नॉन स्टॉप १६ दिवस पाऊस, कोयनेने सत्तरी ओलांडली, धरण परिसरात कायम 'जोर'धार

सातारा : पश्चिम भागात नॉन स्टॉप १६ दिवस पाऊस, कोयनेने सत्तरी ओलांडली, धरण परिसरात कायम 'जोर'धार

ठळक मुद्देपश्चिम भागात नॉन स्टॉप १६ दिवस, कोयनेने सत्तरी ओलांडली धरण परिसरात कायम जोरधार

सातारा : साताऱ्यासह जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर आणखी वाढला असून, रविवारपासून धुवाँधार सुरू आहे. त्यामुळे सोमवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत कोयना धरणात ६९.७८ टीमएसी इतका साठा झाला. तर नवजा येथे २७७ आणि महाबळेश्वरला १८९ मिलीमीटर पाऊस झाला. कोयना धरणात सकाळी आठपर्यंत ४५ हजार ८०२ क्युसेक पाण्याची आवक झाली आहे.

गेल्या १६ दिवसांपासून जिल्ह्याच्या पश्चिम भागात पाऊस कोसळत आहे. या पावसाचा जोर कायम असल्याने ओढे, नाले खळाळू लागले आहेत. तर भात लागणीच्या कामाला वेग आला आहे. रविवारी रात्रीपासून तर पावसाचा जोर आणखी वाढला आहे.

सोमवारी सकाळी आठपर्यंतच्या २४ तासांत कोयनानगर येथे १९२ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. तर धरणात ६९.७८ टीएमसी पाणीसाठा झाला असून, ४५ हजार ८०२ क्युसेक पाण्याची आवक झाली आहे. यंदा गतवर्षीपेक्षा लवकरच धरण भरणार आहे. तर जिल्ह्यातील इतर धरणक्षेत्रातही दमदार पाऊस सुरू आहे.

बलकवडी येथे १८३, उरमोडी ६१ आणि तारळी धरण परिसरात ९० मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. सध्या धोम धरणात ६.६९ टीएमसी, कण्हेर ५.९३, बलकवडी २.९१, उरमोडी ६.१४ तर तारळी धरणात ३.६२ टीमएसी इतका साठा झाला आहे.


धरणक्षेत्रातील २४ तासांतील व एकूण पाऊस मिलीमीटरमध्ये

धोम २५ (४००)
कोयना १९२ (२५५२)
बलकवडी १८३ (१३०८)
कण्हेर ४१(४२१)
उरमोडी ६१ (५९१)
तारळी ९० (१०९६)

साताऱ्यात मुसळधार...

सातारा शहर आणि परिसरात गेल्या १५ दिवसांपासून पाऊस कोसळत आहे. त्यामुळे नागरिकांना घराबाहेर पडणेही अवघड झाले आहे. शुक्रवार, शनिवारी पावसाने काहीकाळ उघडीप दिली होती. असे असलेतरी १५ दिवसांपासून सतत पाऊस पडत आहे. रविवारी रात्रीपासून तर पावसाने अधिकच जोर धरला आहे. त्यामुळे नागरिकांना घरातून बाहेर पडताना छत्री घेऊनच जावे लागत आहे.

Web Title: Satara: Non-stop in the west part of 16 days, Koyane crossed the sixty-seven, permanently in the dam area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.