सातारा : लढाईला विराम; राजकारणाला जोर लोकसभा उमेदवारी : उदयनराजेंची भिस्त पवारांवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2018 12:21 AM2018-09-26T00:21:39+5:302018-09-26T00:22:28+5:30

राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी अखेर चर्चेचे दरवाजे उघडले आहेत. लोकसभा उमेदवारीवरून खासदार उदयनराजे भोसले व पक्षाच्या इतर नेत्यांमध्ये सुरू असलेल्या समोरासमोरील लढाईला या निमित्ताने विराम मिळाला. मात्र पक्षांतर्गत तिकीट काटाकाटीच्या राजकारणाने भलताच जोर धरला आहे

Satara: Pause of the battle; Thrust to politics: Lok Sabha candidate: Udayan Rajen trusts Pawar | सातारा : लढाईला विराम; राजकारणाला जोर लोकसभा उमेदवारी : उदयनराजेंची भिस्त पवारांवर

सातारा : लढाईला विराम; राजकारणाला जोर लोकसभा उमेदवारी : उदयनराजेंची भिस्त पवारांवर

googlenewsNext
ठळक मुद्दे लढाईला विराम; राजकारणाला जोर लोकसभा उमेदवारी : उदयनराजेंची भिस्त पवारांवर

सागर गुजर ।
सातारा : राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी अखेर चर्चेचे दरवाजे उघडले आहेत. लोकसभा उमेदवारीवरून खासदार उदयनराजे भोसले व पक्षाच्या इतर नेत्यांमध्ये सुरू असलेल्या समोरासमोरील लढाईला या निमित्ताने विराम मिळाला. मात्र पक्षांतर्गत तिकीट काटाकाटीच्या राजकारणाने भलताच जोर धरला आहे.
लोकसभा निवडणुकीसाठी खासदार उदयनराजे भोसले तिसऱ्यांदा इच्छुक आहेत.

राष्ट्रवादीची उमेदवारी पुन्हा एकदा मिळावी, यासाठी त्यांनी जोर लावला आहे. यावेळी मात्र पक्षाच्या आमदारांचाच त्यांना जोरदार विरोध आहे. सोमवारी बारामतीत गोविंदबाग येथे झालेल्या बैठकीतही आमदारांनी आपला विरोध खासदार पवारांसमोर व्यक्त केला. (असा कोणताही विरोध आमदारांनी या बैठकीत केला नाही, असे स्पष्टीकरण खा. पवारांनी पुणे येथे पत्रकारांशी बोलताना केले.) तरीही पवारांनी अपेक्षित निर्णय घेतला नसल्याने ही आमदार मंडळी निराश होऊन पुन्हा साताºयात परतली. पवारांच्या मनातील कुणालाच काही ओळखता आलं नाही. दुसºया बाजूला पुण्यातील मोतिबाग या पवारांच्या निवासस्थानी उदयनराजेंनाही आठ दिवस थांबण्याचा सल्ला दिला.

पवारांना काहीही करून साताऱ्याची जागा हातातून सोडायची नाही. एका बाजूला भाजपचे नेते जिल्ह्यात येऊन बालेकिल्ल्याला खिंडार पाडण्याची भाषा वापरतात, तर दुसऱ्या बाजूला आपल्याच पक्षांतर्गत असणारा गृह कलह थांबविण्यासाठी पवारांना आपला राजकारणातील अनुभव कामाला लावावा लागत आहे. राजकारणातील पीक पेरणीपासून काढणीपर्यंत जे काही लागतं, याची इत्यंभूत माहिती असणाऱ्या या कसदार नेत्यापुढे सध्या मोठा पेचप्रसंग उभा आहे. मात्र, यातूनही मार्ग काढण्यासाठी पवारांनी आपली तिसरी फळी कामाला लावली आहे. बारामतीचे नेते असले तरी सातारा जिल्ह्यातील छोट्या कार्यकर्त्यालाही नावासकट ओळखणाºया पवारांची हीच अभ्यासू नीती या निमित्ताने उपयोगात आणण्यासाठी त्यांनी प्रयत्न सुरू केले आहेत.

दस्तुरखुद्द पवारांनीच चर्चेचे दरवाजे खुले केल्याने एकमेकांवर तोंडसुख घेण्याबाबत नेतेमंडळींनी आवर घातल्याचे पाहायला मिळते. समोरासमोरील लढाईला सध्या विराम देण्यात आला आहे. मात्र काटाकाटीचे राजकारण जोर धरू लागले आहे.

लोकसभा निवडणुकांनंतर झालेल्या विधानसभा, पंचायत समिती, जिल्हा परिषद तसेच विधानपरिषदेच्या सांगली-सातारा स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात खा. उदयनराजे भोसले यांनी राष्ट्रवादी नेत्यांना अडचणीत आणल्याचा आरोप आमदारांनी केला आहे. तर दुसऱ्या बाजूला पक्षाचा खासदार असतानाही निर्णय घेताना आपल्याला जाणीवपूर्वक बाजूला ठेवल्याचा आक्षेप खासदार उदयनराजे यांनी घेतला आहे. आता यातून कोणता सुवर्णमध्य काढला जातोय, ते खा. पवारांनाच माहित! तसेही त्यांनी सिक्कीमचे माजी राज्यपाल व आपले महाविद्यालयीन मित्र श्रीनिवास पाटील यांच्या रुपाने हुकुमाचे पान आपल्याजवळ राखून ठेवलेले आहेच.

पवारांची तिसऱ्या फळीकडूनही अपेक्षा
पवारांनी उदयनराजेंचे ऐकले, आमदारांशी दोनदा चर्चा केली. आता या तिसºया ‘डोळ्यांचा’ ते वापर करणार आहेत. कोणाचं बळ किती? याची माहिती एव्हाना घेण्याचे काम सुरू झाले आहे. जे कार्यकर्ते ‘फोकस’मध्ये नाहीत; पण ज्यांचा अनुभव दांडगा आहे. राजकीय परिस्थितीची ज्यांना चांगली समज आहे, अशा कार्यकर्त्यांची मतेही खा. पवार जाणून घेत आहेत.

Web Title: Satara: Pause of the battle; Thrust to politics: Lok Sabha candidate: Udayan Rajen trusts Pawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.