सातारा : सोनके येथे पादचारी वृध्द दुचाकीच्या धडकेत ठार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2018 01:24 PM2018-11-24T13:24:44+5:302018-11-24T13:24:59+5:30

पिंपोडे बुद्रुक : सोनके, ता. कोरेगाव येथे शुक्रवारी सायंकाळी झालेल्या दुचाकीच्या अपघातात पादचारी वृध्दाचा मृत्यू  झाला.

Satara: A pedestrian old man dies at Sonke in a wheelchair | सातारा : सोनके येथे पादचारी वृध्द दुचाकीच्या धडकेत ठार 

सातारा : सोनके येथे पादचारी वृध्द दुचाकीच्या धडकेत ठार 

Next

सातारा -  पिंपोडे बुद्रुक : सोनके, ता. कोरेगाव येथे शुक्रवारी सायंकाळी झालेल्या दुचाकीच्या अपघातात पादचारी वृध्दाचा मृत्यू  झाला. मोहन गंगावणे (वय ६८) असे ठार झालेल्या वृध्दाचे नाव आहे. याबाबत पोलिसांत नोंद झाली आहे. 

याबाबत पोलिसांनी दिलेली व घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार मोहन हरिभाऊ गंगावणे ( रा. सोनके) हे शुक्रवार, दि. २३ रोजी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास सोनकेमधील बेघरवस्ती परिसरातून घरी पायी जात होते. त्यावेळी नांदवळवरून पिंपोडे बुद्रुकच्या दिशेने जाणाºया रमेश पवार (वय  ४२) यांच्या दुचाकीची (एमएच, ११. एएक्स, ९०३४) त्यांना जोराची धडक बसली. यामध्ये मोहन गंगावणे हे गंभीररित्या जखमी झाले. तर दुचाकीस्वारही गंभीर जखमी झाला. या अपघातानंतर दोघांना पिंपोडे बुद्रुकयेथील रुग्णालयात नेण्यात आले. पण, तपासणी केल्यानंतर डॉक्टरांनी मोहन गंगावणे यांचा मृत्यू झाल्याचे जाहीर केले. तर दुचाकीस्वरास पुढील उपचारासाठी सातारा येथे पाठविण्यात आले. 

या घटनेची माहिती मिळताच वाठार स्टेशन पोलिसांनी घटनास्थळावरुन अपघातातील दुचाकी ताब्यात घेतली. या अपघाताची नोंद वाठार स्टेशन पोलीस ठाण्यात झाली असून पुढील तपास सुरू आहे. 

Web Title: Satara: A pedestrian old man dies at Sonke in a wheelchair

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.