सातारा, फलटणला लावणी उत्सव
By admin | Published: February 4, 2015 10:31 PM2015-02-04T22:31:34+5:302015-02-04T23:55:35+5:30
सखींसाठी नजराणा : चैत्रालीराजे यांचा बहारदार कार्यक्रम
सातारा : ‘लोकमत सखी मंच २०१५’ ची विक्रमी सदस्य नोंदणी झाली. या सदस्यांसाठी नवीन वर्षातील धमाकेदार नजराणा म्हणजेच ‘लावणी महोत्सव’ येत्या शनिवार, रविवार घेऊन येत आहोत. शनिवार, दि. ७ फेब्रुवारी रोजी फलटण येथील राजलक्ष्मी लॉन्समध्ये दुपारी २ वाजता प्रसिद्ध लावणी नृत्यांगणा चैत्रालीराजे यांच्या लावणी महोत्सवाचे आयोजन केले आहे. तर सातारा येथील सदस्यांसाठी हाच लावणी शो रविवार, दि. ८ फेब्रुवारी रोजी सायंकाळी सहा वाजता अण्णासाहेब कल्याणी विद्यालय, जिल्हा परिषदजवळ, सातारा येथे आयोजित केला आहे. नेहमीप्रमाणे या कार्यक्रमातही लकी ड्रॉमधून आकर्षक बक्षिसे सखींना जिंकता येणार आहेत. साताऱ्याच्या सखींसाठी कास हॉलिडेज, रिसॉर्टमध्ये एक भाग्यवान सखीला परिवारातील तीन व्यक्तींसोबत एक दिवस मोफत वास्तव्य करता येणार आहे. तीन भाग्यवान सखींना आनंद कृषी पर्यटन केंद्राची शिवार सहल मोफत मिळणार आहे. दोन भाग्यवान सखींना एस.एस. एंटरप्रायजेस तर्फे दोन इस्त्री मिळणार आहेत. तर दहा भाग्यवान सखींना सुर्वेज्मध्ये मोफत जेवण मिळणार आहे. याबरोबरच पाच भाग्यवान सखींना इंपे्रशन ब्युटी पार्लरमध्ये मोफत फेशियल मिळणार आहे. याशिवाय एका भाग्यवान सखीला १८ हजार पाचशे रुपये किमतीची आटाचक्की अनंत ट्रेडिंग यांच्या मार्फत आणि २१ हजार रुपये किमतीचा सोफासेट माउली सोफाज् यांच्याकडून मोफत मिळणार आहे. यावर्षातील सर्व सभासदांना सुमुखी ब्युटीपार्लर यांच्यामार्फत २५० रुपयांचे फेस क्लिनअप मोफत मिळणार आहे. फलटण येथील सखींना कास हॉलिडेज आणि आनंद कृषी पर्यटन केंद्राची सुविधा लकी ड्रॉ मधून मिळणार आहे. शिवाय लक्ष्मी ब्युटी पार्लर यांच्याकडून प्रत्येक सखीला हेअर कट मोफत आणि दोन भाग्यवान सखींना १००० रुपयांचे हेअर स्पा मोफत मिळणार आहे. हॉटेल विसावा आणि हॉटेल रघुनंदनमार्फत वाढदिवसानिमित्त मोफत जेवण मिळणार आहे. मात्र, याकरिता वाढदिवसापासून तीन दिवसांच्या आत या सुविधेचा लाभ घेणे आणि सोबत वाढदिवसाचा पुरावा घेऊन येणे बंधनकारक आहे. जान्हवी ब्युटीपार्लर मार्फत दरमहा दहा सखींना फेशियल, सोनाज ब्युटी पार्लरकडून प्रत्येक सखीला मोफत फेस क्लिनअप आणि आयब्रो आणि सखी साडी सेंटरमध्ये पाचशे रुपयांच्या खरेदीवर दोनशे रुपयांचा डिस्काउंट मिळणार आहे. लकी ड्रॉसाठी आवश्यक असणारे कूपन उद्याच्या अंकात प्रसिद्ध केले जाईल. (प्रतिनिधी)
या कार्यक्रमासाठी २०१५ चे सखी मंचचे ओळखपत्र असल्याशिवाय प्रवेश दिला जाणार नाही. तसेच कार्यक्रमस्थळी सभासद नोंदणी केली जाणार नाही, याची सखींनी नोंद घ्यावी. सहा वर्षांवरील मुलांना प्रवेश दिला जाणार नाही.