परतीच्या पावसाचा फलटण तालुक्यात धुमाकूळ

By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2019 10:47 AM2019-09-25T10:47:57+5:302019-09-25T10:48:12+5:30

पावसाळा संपत आला तरी फलटण तालुक्यात दमदार पाऊस पडला नव्हता, 

satara Phaltan taluka heavy rain | परतीच्या पावसाचा फलटण तालुक्यात धुमाकूळ

परतीच्या पावसाचा फलटण तालुक्यात धुमाकूळ

googlenewsNext

सातारा -  पावसाळा संपत आला तरी फलटण तालुक्यात दमदार पाऊस पडला नव्हता, मात्र सोमवारी रात्री व मंगळवारी रात्री जोरदार पाऊस पडल्याने बुधवारी पहाटे तीन वाजल्यापासून आळंदी पंढरपूर पालखी महामार्ग विडणी ता. फलटण येथील ओढ्याला आलेल्या पुरामुळे पुलावरून पाणी मोठ्या प्रमाणात सुरू असल्याने वाहतूक बंद झाली आहे.
 
जोरदार पावसामुळे रस्ता बंद झाल्याने वाहनांच्या चार किलोमीटर अंतरावर रांगा लागल्या असून, सकाळी या रस्त्यावरून भाजी विक्रीसाठी शाळा, कॉलेजसाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांना परत माघारी जावे लागत आहे, तर एसटी बस व इतर वाहनातील अनेक प्रवासी अडकून पडले आहेत, भाडंळी तालुका फलटण येथील ओढ्याला आलेल्या पुरामुळे फलटण शिंगणापूर रस्त्यावरील वाहतूक पहाटे तीन वाजल्यापासून सकाळी साडेसात वाजेपर्यंत बंद झाली होती, तर अलगुडेवाडी गावच्या ओढ्याला आलेल्या पुरामुळे फलटण या रस्त्यावरील वाहतूक ही पहाटे तीन वाजल्यापासून अद्याप बंद आहे.

Web Title: satara Phaltan taluka heavy rain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.