सातारा : खेलो इंडिया राष्ट्रीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत प्राजक्ता साळुंखे देशात दुसरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2018 06:10 PM2018-02-08T18:10:13+5:302018-02-08T18:16:31+5:30
सातारा येथील अनंत इंग्लिश स्कूलची विद्यार्थिनी प्राजक्ता मधुकर साळुंखे हिने नवी दिल्लीत झालेल्या खेलो इंडिया राष्ट्रीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत देशात दुसरा क्रमांक पटकावला. प्राजक्ताने ६३ किलो वजनी गटात १५७ किलो वजन उचलले.
सातारा : येथील अनंत इंग्लिश स्कूलची विद्यार्थिनी प्राजक्ता मधुकर साळुंखे हिने नवी दिल्लीत झालेल्या खेलो इंडिया राष्ट्रीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत देशात दुसरा क्रमांक पटकावला. प्राजक्ताने ६३ किलो वजनी गटात १५७ किलो वजन उचलले.
या स्पर्धेत प्राजक्ताने ७० किलो स्नॅच तर ८७ किलो क्लिन अँड जर्क केला. दरम्यान, यापूर्वी गुवाहाटी (आसाम) येथे झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत १७ वर्षांखालील गटात सुवर्णपदक पटकावले होते. तेव्हा तिने १५४ किलो वजन उचलले होते.
प्राजक्ताला प्रशिक्षक जितेंद्र देवकर यांचे मार्गदर्शन लाभले. प्राजक्ताचे मूळ गाव सातारा तालुक्यातील पिलाणी हे आहे. तिचे वडील मधुकर साळुंखे केंद्रीय राखीव पोलीस दलात कार्यरत आहेत.
प्राजक्ता सध्या दहावीत शिकत आहे. रोज सकाळी साडेसहा ते नऊ व सायंकाळी साडेपाच ते पावणेनऊ या वेळेत ती अनंत इंग्लिश स्कूलमध्ये वेटलिफ्टिंगचा सराव करते.