दाजीनेच केला १९ वर्षीय मेव्हणीचा विनयभंग, सातारा पोलिसांनी दाजीला केली अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2022 01:51 PM2022-02-19T13:51:19+5:302022-02-19T13:51:39+5:30
घरी एकटीच असल्याचा गैरफायदा घेत शरीर संबंधांचीही केली मागणी
सातारा : एका १९ वर्षीय तरुणीचा तिच्या दाजीनेच विनयभंग केल्याची खळबळजनक घटना साताऱ्यातील एका उपनगरात घडली आहे. संबंधित दाजीवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, पोलिसांनी दाजीला अटक केली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, १९ वर्षीय तरुणी घरात एकटी असताना तिच्या मोठ्या बहिणीचा नवरा घरात आला. तिच्याशी गैरप्रकार करू लागला. एवढेच नव्हे तर त्याने शरीर संबंधांचीही तिच्याकडे मागणी केली. त्यानंतर तिच्यावर जबरदस्ती करू लागल्याने तिने आरडाओरड केली. यामुळे तिला बेडरूममध्ये ढकलून तो तेथून पसार झाला.
या घटनची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तातडीने दाजीचा शोध घेऊन त्याला अटक केली. या घटनेमुळे त्या उपनगरात खळबळ उडाली आहे. सातारा शहर पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद झाली आहे.