वाहन चोर आंतरराज्य टोळी जेरबंद, सव्वा कोटींची १८ वाहने जप्त; सातारा पोलिसांची दबंग कारवाई

By नितीन काळेल | Published: May 5, 2023 01:35 PM2023-05-05T13:35:27+5:302023-05-05T13:44:20+5:30

या कारवाईमुळे आंतरराज्य वाहन चोरी करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश झाला

Satara police arrested an inter state gang of vehicle thieves, 18 vehicles worth half a crore seized | वाहन चोर आंतरराज्य टोळी जेरबंद, सव्वा कोटींची १८ वाहने जप्त; सातारा पोलिसांची दबंग कारवाई

वाहन चोर आंतरराज्य टोळी जेरबंद, सव्वा कोटींची १८ वाहने जप्त; सातारा पोलिसांची दबंग कारवाई

googlenewsNext

सातारा : सातारा जिल्हा पोलिस दलाच्या स्थानिक गुन्हे शाखेने दबंग कारवाई करत वाहन चोरणाऱ्या आंतरराज्य टोळीला जेरबंद केले. तसेच दुचाकी चोरट्यांच्याही मुसक्या आवळल्या. या दोन्ही कारवाईत चारचाकी १० तर ८ चोरीच्या दुचाकी जप्त केल्या आहेत. या वाहनांची किंमत सुमारे सवा कोटी रुपये आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, पोलिस अधीक्षक समीर शेख आणि अतिरिक्त पोलिस अधीक्षक बापू बांगर यांनी जिल्ह्यातील वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याची सूचना स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अरुण देवकर यांना केली होती. या अनुषंगाने देवकर यांनी सहायक पोलिस निरीक्षक रवींद्र भोरे आणि उपनिरीक्षक अमित पाटील व विश्वास शिंगाडे यांच्या नेतृत्वाखाली तीन पथके तयार केली. दरम्यान, दि. ३० एप्रिल रोजी पोलिस निरीक्षक अरुण देवकर यांना बातमीदारामार्फत पोलिस रेकाॅर्डवरील अजिम सलीम पठाण (वय ३८, रा. रहिमतपूर, ता. कोरेगाव) याने परराज्यातून चाेरीतील चारचाकी वाहने आणून ती साताऱ्यासह रायगड आणि सोलापूर जिल्ह्यात विक्री केल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार त्यांनी अजिम पठाणला ताब्यात घेण्याची सूचना केली.

पोलिसांच्या या पथकाने अजिम पठाण आणि कोल्हापूर येथील एकाच्या ठावठिकाणाबाबत गोपनीय माहिती प्राप्त केली. तसेच रहिमतपूरहून पठाणला ताब्यात घेतले. त्यानंतर सातारा शहरातील शाहूपुरी पोलिस ठाण्यातील एका गुन्ह्यात अटक केली. चौकशी दरम्यान त्याने परराज्यातून चोरीची ७ वाहने आणून सातारा, रायगड जिल्ह्यात विक्री केल्याचे सांगितले. त्यानंतर पोलिसांनी शाहूपुरी पोलिस ठाण्यात नोंद चाेरीतील कार तसेच दिल्ली व उत्तरप्रदेश राज्यात चोरी केलेल्या अशी एकूण १० चारचाकी वाहने जप्त केली. या गाड्यांची किंमत १ कोटी १५ लाख रुपये इतकी आहे. या कारवाईमुळे आंतरराज्य वाहन चोरी करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश झाला.

दरम्यान, दि. २ मे रोजी पोलिस निरीक्षक अरुण देवकर यांना पोलिस रेकाॅर्डवरीलच महेश रामचंद्र अवघडे व त्याच्या दोन साथीदारांनी भुईंज पोलिस ठाणे हद्दीत एकास मारहाण करुन त्यांची दुचाकी व खिशातील १८३० रुपये जबरदस्तीने चोरुन नेले होते. त्याबाबत भुईंज ठाण्यात गुन्हा नोंद होता. याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी कारवाई करत महेश अवघडे व त्याच्या साथीदाराकडून विविध ठिकाणाहून चोरलेल्या ८ दुचाकी जप्त केल्या. या दुचाकींची किंमत ३ लाख २० हजार रुपये आहे.

Web Title: Satara police arrested an inter state gang of vehicle thieves, 18 vehicles worth half a crore seized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.