आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धेत सातारच्या पोलिसांची बाजी
By admin | Published: June 27, 2017 03:52 PM2017-06-27T15:52:58+5:302017-06-27T15:52:58+5:30
देशविदेशातील पाच हजार स्पर्धक सहभागी
आॅनलाईन लोकमत
सातारा , दि. २७ : मुंबई येथील आंतरराष्ट्रीय टरब्लेझर मोसमी मॅरेथॉन स्पर्धेत जिल्हा पोलिस दलातील वसंत साबळे, संजय शिर्के, आतिष घाडगे आणि हेमंत मुळीक यांनी साताऱ्याचे नाव अटकेपार पोहोचविले.
टरब्लेझर मॅरेथॉन स्पर्धा बांद्रा (मुंबई) येथे घेण्यात आल्या. या स्पर्धेमध्ये देश-विदेशातील सुमारे पाच हजार स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. हवालदार वसंत साबळे यांनी १० किलोमीटर अंतर ५६ मिनीटांत पूर्ण करून प्रथम क्रमांकाची ट्राफी व गोल्ड मेडल पटकावून महाराष्ट्राच्या राजधानीत सातारा पोलिस दलाचे नाव उंचावले. त्यांच्याप्रमाणेच हवालदार संजय शिंदे, हेमंत मुळीक, आतिष घाडगे यांनीही ही स्पर्धा कमी वेळेत पुर्ण करून सिल्वर मेडल पटकावले.
या पोलिसांनी यापूवीर्ही सातारा हिल, गोवा, कृष्णा कऱ्हाड, कोल्हापूर अशा विविध ठिकाणी झालेल्या मॅरेथॉन स्पर्धेमध्ये भाग घेतला आहे. जिल्हा पोलिस अधीक्षक संदीप पाटील, अप्पर पोलिस अधीक्षक विजय पवार यांनी या पोलिस कर्मचाऱ्यांचे कौतुक केले.