मुख्यमंत्र्यांच्या रडारवर साताऱ्याचं राजकारण

By admin | Published: May 24, 2017 11:06 PM2017-05-24T23:06:45+5:302017-05-24T23:06:45+5:30

मुख्यमंत्र्यांच्या रडारवर साताऱ्याचं राजकारण

Satara politics on the Chief Minister's radar | मुख्यमंत्र्यांच्या रडारवर साताऱ्याचं राजकारण

मुख्यमंत्र्यांच्या रडारवर साताऱ्याचं राजकारण

Next

 !लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सातारा जिल्ह्यात महिनाभरातला तिसरा दौरा आखला आहे. सोमवारी (दि. २९) मुख्यमंत्री पुन्हा जिल्ह्यात येत आहेत. माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्या कऱ्हाड दक्षिण मतदारसंघातील सोहळ्यात अनेक दिग्गज मंडळींचा भाजपमध्ये पक्षप्रवेश होणार आहे.
पश्चिम महाराष्ट्रामध्ये भाजपचं कमळ फुलविण्याचा विषय मुख्यमंत्र्यांनी भलताच मनावर घेतल्याचं स्पष्टपणे दिसू लागलंय. वाई-महाबळेश्वर-खंडाळा, सातारा, कोरेगाव, माण-खटाव मतदारसंघांत भाजपच्या मंत्र्यांनी वेळोवेळी उपस्थिती लावली आहे.
कऱ्हाड उत्तरमध्ये मनोज घोरपडे यांना भाजपने बळ दिले आहे. याच कऱ्हाड उत्तरमधील धैर्यशील कदम यांचीही मागील दौऱ्यात मुख्यमंत्र्यांशी विकासाच्या मुद्द्यावर चर्चा झाली आहे. आता कऱ्हाड दक्षिणमध्ये काँगे्रस, राष्ट्रवादीसह स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे दिग्गज लोक भाजपमध्ये खेचून घेण्याचे सत्र सुरू झाले आहे. सोमवारीही ‘पक्ष प्रवेश’ हाच मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याचा मुख्य उद्देश आहे.
कऱ्हाड दक्षिण, फलटण विधानसभा मतदारसंघांच्या निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून अनेकांना प्रवेश दिला जाणार आहे. मात्र, भाजपमध्ये कोण-कोण प्रवेश करणार? ही बाब मात्र अत्यंत गोपनीय ठेवण्यात आली आहे. जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर यांच्याशी संपर्क साधला असता, ‘नावे ऐनवेळी कळतील,’ असे सूचक वक्तव्य त्यांनी केले.
मलकापूरला वेध नगरपरिषदेचे !
कऱ्हाड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील मलकापूर नगरपंचायतीचा टापू आजपर्यंत पृथ्वीराज चव्हाण यांच्या काँग्रेसचा हुकमी एक्का समजला गेला.
हे ध्यानात घेऊनच सत्ताधारी भाजपने
मलकापूरवर लक्ष केंद्रित केले असून, ही नगरपंचायत लवकरच नगरपालिकेत रूपांतरित होणार आहे.
या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वत: मलकापूर येथे शिवार सभा घेणार आहेत.

Web Title: Satara politics on the Chief Minister's radar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.