सातारा : रॅलीतून प्लास्टिकमुक्तीची जनजागृती, काटवलीत घराघरातून पिशव्या गोळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2018 13:02 IST2018-09-21T12:58:47+5:302018-09-21T13:02:47+5:30
काटवलीची वाटचाल स्मार्ट ग्रामकडे चालली असून ग्रामपंचायत, विद्यार्थी व युवकांनी प्लास्टिक बंदीचा नारा देत पर्यावरण वाचविण्याचा संकल्प केला. याच माध्यमातून प्लॅस्टिकमुक्तीचा संदेश देण्यासाठी जनजागरण रॅली काढण्यात आली. यावेळी घरोघरी जाऊन प्लास्टिक पिशव्या गोळा केल्या.

सातारा : रॅलीतून प्लास्टिकमुक्तीची जनजागृती, काटवलीत घराघरातून पिशव्या गोळा
पाचगणी (सातारा) : काटवलीची वाटचाल स्मार्ट ग्रामकडे चालली असून ग्रामपंचायत, विद्यार्थी व युवकांनी प्लास्टिक बंदीचा नारा देत पर्यावरण वाचविण्याचा संकल्प केला. याच माध्यमातून प्लॅस्टिकमुक्तीचा संदेश देण्यासाठी जनजागरण रॅली काढण्यात आली. यावेळी घरोघरी जाऊन प्लास्टिक पिशव्या गोळा केल्या.
महाराष्ट्र शासनाच्या प्लास्टिक व थर्माकोल या अविघटनशील वस्तूंचा वापर न करता त्यावर बंदी घालण्याच्या अधिसूचनेनुसार व जिल्हा परिषद सातारा आणि जावळी पंचायत समिती यांच्या आदेशानुसार ग्रामपंचायत क्षेत्रात या अधिसूचनेची अंमलबजावनी करण्यासाठी काटवली येथे ग्रामपंचायत आणि प्राथामिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी रॅली काढली.
प्लास्टिकचा वापर टाळा आणि पर्यावरण वाचवा असा संदेश दिला. गणेशोत्सव काळात प्लास्टिक व थर्माकोलच्या मोठ्या प्रमाणात होत असणाऱ्या वापराचे औचित्य साधून ही रॅली काढली.
यामध्ये सरपंच हणमंत बेलोशे, उपसरपंच दत्तात्रय सुतार, सदस्या सविता बेलोशे, अलका शिंदे, नंदा बेलोशे, मेघा जंगम, मुख्याध्यापक शैलेश महामुनी, ग्रामसेवक धनराज वट्टे, महादेव बेलोशे तसेच शाळेचे विद्यार्थी सहभागी झाले होते.
|
यावेळी प्लास्टिकचा वापर टाळा पर्यावरण वाचावा, कागदी पिशव्यांचा वापर कराह्ण, अशा घोषणा विद्यार्थ्यांनी दिल्या. ग्रामपंचायत सदस्यांनी घरोघरी जाऊन प्लस्टिकचे दुष्परिणाम सर्वांना सांगितले. यावेळी प्रत्येक घरातील प्लास्टिक कचऱ्यांची कायमची विल्हेवाट लावण्यासाठी सुमारे दीडशे किलो प्लास्टिक कचरा गोळा करण्यात आला केला.
महाराष्ट्र अविघटनशील कचरा कायदा २००६ चे कलम ९ नुसार प्लास्टिक वस्तूच्या वापरावर बंदी घालण्यात आली आहे. वापर करणाऱ्यास दंड अथवा शिक्षेची तरतूद केली आहे. त्यामुळे गावात कुणीही प्लास्टिकचा वापर करू नये असे आवाहन सरपंच हणमंत बेलोशे यांनी केले.