सातारा : दगडी चाळीतला असल्याचे सांगत पोलिसांच्या अंगावर ओतले रॉकेल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2018 01:57 PM2018-09-24T13:57:02+5:302018-09-24T14:04:32+5:30
जावळी तालुक्यातील आलेवाडी येथे एका गुन्ह्याच्या तपासासाठी आलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना मी दगडी चाळीतला आहे, असे सांगत त्यांच्या अंगावर चक्क रॉकेल ओतण्यात आले. तसेच शिवीगाळ करून पेटवून टाकण्याची धमकीही देण्यात आली. याप्रकरणी मेढा पोलिसांनी भिकाजी पवार याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला असून, त्याला अटकही केली आहे.
मेढा/सातारा : जावळी तालुक्यातील आलेवाडी येथे एका गुन्ह्याच्या तपासासाठी आलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना मी दगडी चाळीतला आहे, असे सांगत त्यांच्या अंगावर चक्क रॉकेल ओतण्यात आले. तसेच शिवीगाळ करून पेटवून
टाकण्याची धमकीही देण्यात आली. याप्रकरणी मेढा पोलिसांनी भिकाजी पवार याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला असून, त्याला अटकही केली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, रविवार, दि. २३ रोजी आलेवाडीत झालेल्या बैठकीत मंडळाच्या हिशेबावरून वाद झाला होता. त्या बैठकीत भिकाजी पवार याने एकावर ब्लेडने वार केले. त्याची दहशत असल्याने तक्रार करण्यास
कोणीही पुढे येत नव्हते. ग्रामस्थांकडून याची माहिती पोलिसांना मिळताच पोलीस आलेवाडीमध्ये या घटनेचा मागोवा घेण्यासाठी गेले होते.
मेढा पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक जीवन माने यांच्यासह चार पोलीस कर्मचारी तपासासाठी येताच घरात बसलेल्या भिकाजी पवार याने मी दगडी चाळीतला आहे असे म्हणत घरातील रॉकेलने भरलेला कॅन थेट पोलिसांच्या अंगावर ओतून त्यांना पेटवून देण्याची धमकी दिली. तसेच त्याने शिवीगाळही केली. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, भिकाजी पवार याला अटक केली आहे.