साताऱ्यात जुगार अड्ड्यावर छापा; १७ जण ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2019 01:59 PM2019-07-17T13:59:15+5:302019-07-17T14:00:47+5:30

शाहूपुरी आणि सातारा शहर पोलिसांनी मंगळवारी सायंकाळी शहर व परिसरात आठ ठिकाणी जुगार अड्ड्यावर छापे टाकून १७ जणांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून २१ हजारांची रोकडही पोलिसांनी जप्त केली आहे.

Satara raid on gambling basement; 17 people in custody | साताऱ्यात जुगार अड्ड्यावर छापा; १७ जण ताब्यात

साताऱ्यात जुगार अड्ड्यावर छापा; १७ जण ताब्यात

Next
ठळक मुद्देसाताऱ्यात जुगार अड्ड्यावर छापा; १७ जण ताब्यात२१ हजारांची रोकड जप्त : शाहूपुरी अन् शहर पोलिसांची कारवाई

सातारा : शाहूपुरी आणि सातारा शहर पोलिसांनी मंगळवारी सायंकाळी शहर व परिसरात आठ ठिकाणी जुगार अड्ड्यावर छापे टाकून १७ जणांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून २१ हजारांची रोकडही पोलिसांनी जप्त केली आहे.

प्रकाश ताब्याबा इंगळे (वय ५५, पिंपळवाडी, ता. सातारा), नासिरहुसेहन दिलावर शेख (वय ३८, रा. शनिवार पेठ, सातारा), यासीन शेख (रा. गुरुवार परज सातारा), सादीक आयुब सय्यद (वय ३५, रा. गरुवार पेठ, सातारा), समीर सलीम कच्छी (रा. मोळाचा ओढा परिसर, सातारा), जयदीप पोपटराव यादव (वय ३६, वाढे, ता. सातारा), शंकर निवृत्ती कांबळे (वय २६, रा. पाटखळ, ता. सातारा), यासीन इकबाल शेख (वय ४०, रा. नकाशपुरा पेठ, सातारा) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. शाहूपुरी पोलिसांनी ही कारवाई बसस्थानक, सदाशिव पेठ, करंजे नाका येथे केली.

सातारा शहर पोलिसांनी गोडोली आणि देगाव फाटा येथे चार ठिकाणी कारवाई केली. या ठिकाणी वसंत कृष्णा वैराट (वय ६४), वसीम शेख (रा. सातारा), धनाजी दत्तात्रय खोपडे (वय ५४, रा. देगाव फाटा परिसर), चंदू चोरगे (रा. रविवार पेठ, सातारा), अरूण भगवान शिंदे (रा. गोडोली), यासीन शेख (रा. गरुवार परज सातारा), उदय विश्वास मोरे (वय ४३, अमरलक्ष्मी कोडोली, सातारा), यासीन शेख (रा. गुरूवार परज सातारा) यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

आठ जुगार अड्ड्यावर पोलिसांनी २१ हजारांची रोकडही जप्त केली आहे. दोन्ही पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी मंगळवारी सायंकाळी एकाचेळी शहर आणि परिसरात जुगार अड्ड्यावर छापासत्र सुरू केले. त्यामुळे अवैद्य व्यावसायिकांचे धाबे दणाणले होते.
 

Web Title: Satara raid on gambling basement; 17 people in custody

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.