सातारा :पाऊस वाढला; विसर्ग कमी, कोयनेचे दरवाजे चार फुटांवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2018 01:36 PM2018-08-21T13:36:54+5:302018-08-21T13:40:12+5:30
सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात पाऊस सुरूच असून, सोमवारी सायंकाळपासून जोर वाढला आहे. कोयना धरण परिसरात मंगळवारी सकाळपर्यंत ७४ मिलीमीटर पाऊस झाला असून, १०१.४५ टीएमसी पाणीसाठा झाला होता. तर धरणाचे दरवाजे दोन फुटांपर्यंत खाली आणण्यात आले आहेत.
सातारा : जिल्ह्याच्या पश्चिम भागात पाऊस सुरूच असून, सोमवारी सायंकाळपासून जोर वाढला आहे. कोयना धरण परिसरात मंगळवारी सकाळपर्यंत ७४ मिलीमीटर पाऊस झाला असून, १०१.४५ टीएमसी पाणीसाठा झाला होता. तर धरणाचे दरवाजे दोन फुटांपर्यंत खाली आणण्यात आले आहेत.
जिल्ह्याच्या पश्चिम भागात सतत अनेक दिवस पाऊस पडला. या पावसामुळे जिल्ह्याच्या पश्चिम भागातील असणारी प्रमुख धरणे भरल्यातच जमा आहेत. मंगळवारी सकाळपर्यंत कोयना धरण परिसरात ७४ मिलीमीटर पाऊस झाला. धरणात १०१.४५ टीएमसी इतका पाणीसाठा झाला.
पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी सोमवारी सायंकाळपासून धरणाचे दरवाजे दोन फुटांपर्यंत खाली आणण्यात आले आहेत. दरवाजातून १६७७६ तर पायथा वीजगृहातून २१०० असे मिळून १८८७६ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
मंगळवारी सकाळपर्यंत धोम धरणात १२.५८ टीएमसी पाणीसाठा होता. तर कण्हेरमध्ये ९.४९, बलकवडी ३.९२ तर तारळी धरणात ५.५३ टीएमसी साठा होता. तारळी धरणातून पाणी सोडणे बंद करण्यात आले आहे. तर धोम धरणातून १७७४, कण्हेर ३९२३, बलकवडी ३०३ तर उरमोडी धरणातून ४५० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
धरणक्षेत्रातील २४ तासांतील व एकूण पाऊस मिलीमीटरमध्ये
धोम १२ /५६४
कोयना ७४ /४६९०
बलकवडी ३७ /२३३३
कण्हेर ११/६४७
उरमोडी १८ /१०६१
तारळी ३० /१९६९