सातारा : मान्सूनच्या बरसण्याने पाणीच पाणी !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 8, 2018 12:03 PM2018-06-08T12:03:48+5:302018-06-08T12:03:48+5:30
सातारा जिल्ह्यात मान्सूनच्या पावसाने हजेरी लावण्यास सुरुवात केली असून, सातारा शहर व परिसरात गुरुवारी पहाटेच्या सुमारास चांगलाच पाऊस बरसला. त्यामुळे सर्वत्र पाणीपाणी झाले होते. तर दुष्काळी भागातही पाऊस झाल्याने बळीराजांत आनंदाचे वातावरण आहे.
सातारा : जिल्ह्यात मान्सूनच्या पावसाने हजेरी लावण्यास सुरुवात केली असून, सातारा शहर व परिसरात गुरुवारी पहाटेच्या सुमारास चांगलाच पाऊस बरसला. त्यामुळे सर्वत्र पाणीपाणी झाले होते. तर दुष्काळी भागातही पाऊस झाल्याने बळीराजांत आनंदाचे वातावरण आहे.
दरवर्षी मे महिन्यात जिल्ह्यात वळवाचा पाऊस होतो. त्यामुळे शेतकरी मशागतीची कामे हाती घेतात; पण यावर्षी वळवाचा पाऊस अपेक्षित असा झालाच नाही, त्यामुळे मे महिनाअखेर वातावरणात उकाडा कायम होता. तर जून महिना सुरू झाल्यापासून जिल्ह्यात पाऊस बरसू लागला आहे.
माण, खटाव, खंडाळा, कोरेगाव, फलटण तालुक्यांत पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. तर बुधवारपासून मान्सूनचा पाऊस कोसळू लागला आहे. खंडाळा, जावळी, महाबळेश्वर, सातारा, खटाव तालुक्यांत बुधवारी चांगलाच पाऊस झाला. हा पाऊस रात्री उशिरापर्यंत सुरू होता.
यामुळे शेतीचे नुकसानही झाले. तर गुरुवारी मध्यरात्री व पहाटेच्या सुमारास जिल्ह्यातील विविध ठिकाणी पावसाने जोरदार हजेरी लावली. या पावसामुळे शेतीच्या मशागतीच्या कामांना वेग येणार आहे.