सातारा : त्यांच्या स्मरणार्थ आंबेनळीत आठवण पॉर्इंट, अपघातस्थळी लावला फलक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2018 01:03 PM2018-08-21T13:03:46+5:302018-08-21T13:07:59+5:30

आंबेनळी घाटात २८ जुलै रोजी घडलेल्या अपघातातील मृतांचे सदैव स्मरण राहावे, या हेतून दापोली येथील नागरिकांनी अपघातस्थळाचे आठवण पॉर्इंट असे नामकरण करून मृतांना श्रद्धांजली वाहिली आहे.

Satara: Reminiscent of the memorial in the memory of their memories, the accidental plaque | सातारा : त्यांच्या स्मरणार्थ आंबेनळीत आठवण पॉर्इंट, अपघातस्थळी लावला फलक

सातारा : त्यांच्या स्मरणार्थ आंबेनळीत आठवण पॉर्इंट, अपघातस्थळी लावला फलक

googlenewsNext
ठळक मुद्दे त्यांच्या स्मरणार्थ आंबेनळीत आठवण पॉर्इंट, अपघातस्थळी लावला फलकदापोलीतील नागरिकांकडून मृतांना अनोख्या पद्धतीने श्रद्धांजली

सातारा : महाबळेश्वर-पोलादपूर मार्गावर असलेल्या आंबेनळी घाटात सुमारे आठशे फूट खोल दरीत मिनी बस कोसळून तीस जणांचा दुर्दैवी अंत झाला होता. २८ जुलै रोजी घडलेल्या घटनेच्या आठवणी आजही काळीज पिळटवून टाकतात.

या अपघातातील मृतांचे सदैव स्मरण राहावे, या हेतून दापोली येथील काही नागरिकांनी अपघातस्थळाचे आठवण पॉर्इंट असे नामकरण करून मृतांना अनोख्या पद्धतीने श्रद्धांजली वाहिली आहे. अशा आशयाचा फलकही घटनास्थळी लावण्यात आला आहे.

महिन्याचा चौथा शनिवार आणि रविवार अशी सलग सुटी असल्याने दापोली येथील कोकण कृषी विद्यापीठाच्या कर्मचाऱ्यांनी महाबळेश्वरला पिकनिकसाठी जाण्याचा निर्णय घेतला होता. दि. २८ जुलै रोजी कृषी विद्यापीठाचीच बस त्यांनी भाड्याने घेतली होती. सकाळी सात वाजता सर्वजण कृषी विद्यापीठात एकत्र आले. त्यानंतर पुढील प्रवासाला निघाले.

बसमध्ये एकूण ३१ जणांचा समावेश होता. बसमधील सर्व कर्मचारी विनोद करत होते. त्यामुळे सर्वजण मोठ-मोठ्याने हसू लागले. चालक प्रशांत भांबेड यालाही हसू आवरता आले नाही. एका विनोदावर त्याने काही क्षणासाठी मागे वळून पाहिले आणि इथेच घात झाला. आंबेनळी घाटातील दाभिळ टोकाजवळ बस उजव्या बाजूला असलेल्या आठशे फूट दरीत कोसळली.

या अपघातात बसमधील ३० जणांचा दुर्दैवी अंत झाला होता. तर एकजण बचावला होता. एनडीआरएफ, महाबळेश्वर, पोलादपूर, खेड, महाड, दापोली येथील ट्रेकर्सचे जवान व पोलिसांनी सलग २४ तास मदतकार्य करून दरीतील मृतदेह
बाहेर काढले होते. या अपघाताच्या आठवणींनी आजही अंगावर काटा उभा राहतो. अपघातातील मृतांचे सर्वांना कायम स्मरण व्हावे, यासाठी दापोली येथील नागरिकांनी मृतांना अनोख्या पद्धतीने श्रद्धांजली वाहिली आहे.

या अपघातस्थळाचे आठवण पॉर्इंट असे नामकरण करण्यात आले आहे. अशा आशयाचा फलकही घटनास्थळी लावण्यात आला असून, त्यावर काळाने घाला घातलेल्या मृतांना भावपूर्ण श्रद्धांजलीह्ण असे शब्दही लिहिण्यात आले आहेत.
 

Web Title: Satara: Reminiscent of the memorial in the memory of their memories, the accidental plaque

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.