साताऱ्यात धाक दाखवून दोघांना लुटले, युवकासह विवाहित महिलेचा दोन घटनेत समावेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2019 03:46 PM2019-04-26T15:46:54+5:302019-04-26T15:50:05+5:30

चाकूचा धाक दाखवून एका युवकाला व एका विवाहित महिलेला लुटल्याची खळबळजनक घटना बुधवारी सायंकाळी सातारा शहराजवळ घडली. दोघांकडून सुमारे अडीच लाखांचा ऐवज चोरीस गेल्याचे उघडकीस आले आहे.

Satara robbed and robbed both, including a married woman with two children, in two incidents | साताऱ्यात धाक दाखवून दोघांना लुटले, युवकासह विवाहित महिलेचा दोन घटनेत समावेश

साताऱ्यात धाक दाखवून दोघांना लुटले, युवकासह विवाहित महिलेचा दोन घटनेत समावेश

Next
ठळक मुद्देसाताऱ्यात धाक दाखवून दोघांना लुटलेयुवकासह विवाहित महिलेचा समावेश

सातारा : चाकूचा धाक दाखवून एका युवकाला व एका विवाहित महिलेला लुटल्याची खळबळजनक दोन घटना बुधवारी सायंकाळी सातारा शहराजवळ घडली. दोघांकडून सुमारे अडीच लाखांचा ऐवज चोरीस गेल्याचे उघडकीस आले आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, गणेश सुधाकर पवार (वय २१,मूळ रा. रावगाव ता. करमाळा. सध्या रा. आदित्य नगरी, बॉम्बे रेस्टॉरंट परिसर सातारा) हा एका फायनान्स कंपनीमध्ये मॅनेजर म्हणून काम करत आहे. बुधवारी दुपारी साडेचार वाजता गणेश हा म्हसवे गावच्या हद्दीतील माईलस्टोन हॉटेलजवळून येत असताना त्याला दोन युवकांनी अडवले.

त्याला चाकूचा धाक दाखवून त्याच्याकडील मोबाईल तसेच १ लाख ५६ हजारांची रोकड चोरट्यांनी लांबविली. या प्रकारानंतर गणेश याने सातारा तालुका पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली.

दुसरी घटना औद्योगिक वसाहतीमध्ये घडली. प्रतीक्षा गिरीष नारकर (वय २१, रा. चिमणपुरा पेठ, सातारा) ही युवती कंपनीतून कामावरून सुटल्यानंतर घरी निघाली होती. फुलोरा चौक ते कल्याण रिसॉर्टदरम्यान ती चालत जात असताना बुधवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास तीनजणांनी तिला अडवले.

धाक दाखवून मंगळसूत्र, अंगठी त्यांनी जबरदस्तीने काढून घेतली. त्यानंतर तिची पर्स घेऊन चोरट्यांनी पलायन केले. या घटनेनंतर घाबरलेल्या प्रतीक्षाने आपल्या घरी हा प्रकार सांगितला. शहर पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत या घटनेची नोंद झाली नव्हती.

Web Title: Satara robbed and robbed both, including a married woman with two children, in two incidents

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.