सातारा आरटीओचा महसूल वसुलीत राज्यात डंका!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2021 04:27 AM2021-06-11T04:27:12+5:302021-06-11T04:27:12+5:30

दत्ता यादव लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : जिल्ह्यात गत दीड वर्षापासून कोरोनाच्या हाहाकाराने सर्वच व्यवसाय ठप्प झाले असतानाच उपप्रादेशिक ...

Satara RTO's revenue collection in the state! | सातारा आरटीओचा महसूल वसुलीत राज्यात डंका!

सातारा आरटीओचा महसूल वसुलीत राज्यात डंका!

Next

दत्ता यादव

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : जिल्ह्यात गत दीड वर्षापासून कोरोनाच्या हाहाकाराने सर्वच व्यवसाय ठप्प झाले असतानाच उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने मात्र महसुलीचे ‘टार्गेट’ पूर्ण करून राज्यात डंका गाजवला. उत्कृष्ट कामगिरीमध्ये सातारा जिल्ह्याचा पहिल्या पाच जिल्ह्यांमध्ये समावेश करण्यात आलाय. कर वसुली आणि अवैध व्यवसायातील कारवाईतून हा ५ कोटी ८१ लाखांचा महसूल शासनाच्या तिजोरीत जमा झाला.

जिल्ह्यात गत दीड वर्षांपूर्वी कोरोनाचे वारे घोंगावत आले. एखाद्या चक्रीवादळाप्रमाणे या कोरोनाने जनतेला भुईसपाट केले. कधी लॉकडाऊन तर कधी शिथिलता असे करत दळणवळण पूर्वपदावर येत होते. याच शिथिलतेचा उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने सदुपयोग केला. ऑक्टोबरअखेर केवळ २१ लाख कारवाईतून महसूल जमा झाला होता. यामध्ये आणखी वाढ व्हावी, यासाठी कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी एकही दिवस सुट्टी न घेता कारवाईवर भर दिला.

विशेष म्हणजे मार्चअखेर तब्बल २ कोटी २५ लाखांपर्यंत महसूल जमा झाला. केवळ साडेचार महिन्यांमध्ये उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने किमया करून दाखवली. एकीकडे कोरोनामुळे जनता घरात असली तरी बाहेर रस्त्यावर अवैध प्रकारही सुरू होते. त्यावर नियंत्रण आणण्याबरोबरच अधिकाऱ्यांनी कर वसुली आणि दंडातून हा महसूल जमा केला. २०२०-२०२१ या आर्थिक वर्षामध्ये उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने शासनाच्या तिजोरीत तब्बल ५ कोटी ८१ लाख रुपये जमा केले. कोरोनाच्या सावटातही सातारा उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने केलेल्या कामगिरीची दखलही राज्य शासनाने घेतली. पहिल्या पाच जिल्ह्यांमध्ये सातारा जिल्ह्याचा समावेश करण्यात आला. या कामगिरीचे पत्र शासनाने उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाला पाठवून अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या पाठीवर शाब्बासकीची थाप मारली.

जिल्ह्यातील इतर महसुली कार्यालयांमध्ये सध्या शुकशुकाट जाणवत आहे. असे असताना उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने केलेली ही कामगिरी अधिकारी व कर्मचाऱ्यांना पुढील काळात आणखीनच चांगले काम करण्यास प्रेरणा देईल.

चौकट: वायुवेग पथकाचा धसका

उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील अधिकाऱ्यांचे वायुवेग पथक रात्रं-दिवस फिल्डवर होते. या कारवाई दरम्यान येणाऱ्या अडचणी आणि दबाव झुगारून अधिकाऱ्यांनी कोणाचीही गय केली नाही. अवैध प्रवासी वाहतुकीवर या पथकाने विशेष लक्ष केंद्रीत केले. विशेष म्हणजे २४ तासात ९८ बसेसवर या पथकाने कारवाई केली.

कोट : अधिकारी व कर्मचाऱ्यांनी एकही दिवस सुट्टी घेतली नाही. अवैध प्रवासी वाहतुकीची ठिकाणे हेरून आमच्या अधिकाऱ्यांनी काम केले. रोजच्या रोज त्याचा आढावा घेतला जात होता. त्यामुळे अवैध प्रवासी वाहतुकीवर नियंत्रण आणण्यात आम्हाला यश आले. याचीच दखल शासनाने घेतली.

- विनोद चव्हाण, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, सातारा

आयकार्ड फोटो आहे..

Web Title: Satara RTO's revenue collection in the state!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.