सातारा : पाटण परिसरात भूकंपाचा सौम्य धक्का, रिश्टर स्केलवर २.८ तीव्रता : जानेवारी महिन्यात तिसऱ्यांदा हादरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2018 06:44 PM2018-01-24T18:44:06+5:302018-01-24T18:47:49+5:30
पाटण शहरासह परिसरात बुधवारी सकाळी सहा वाजून नऊ मिनीटांनी भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला. याची तीव्रता २.८ रिश्टर स्केल होती. या भूकंपाचा केंद्रबिंदू वारणा खोऱ्यात होता. जानेवारी महिन्यात आतापर्यंत तिसऱ्यांदा भूकंपाचा धक्का जाणवला आहे. पाटण तालुक्यासह कोयना धरण परिसर तसेच वारणा खोरे या भागात अधूनमधून भूकंपाचे धक्के जाणवत असतात.
सातारा : पाटण शहरासह परिसरात बुधवारी सकाळी सहा वाजून नऊ मिनीटांनी भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला. याची तीव्रता २.८ रिश्टर स्केल होती. या भूकंपाचा केंद्रबिंदू वारणा खोऱ्यात होता. जानेवारी महिन्यात आतापर्यंत तिसऱ्यांदा भूकंपाचा धक्का जाणवला आहे. पाटण तालुक्यासह कोयना धरण परिसर तसेच वारणा खोरे या भागात अधूनमधून भूकंपाचे धक्के जाणवत असतात.
भूकंपाचे हे धक्के बहुतांशी सौम्य स्वरुपाचे असतात. या भूकंपाची नोंद कोयना भूकंप मापन केंद्रावर होत असते. जानेवारी महिन्यात आतापर्यंत तीनवेळा भूकंपाची नोंद या केंद्रावर झाली आहे. हे तीनही भूकंप साधारणपणे ३ रिश्टर स्केलच्या आसपासचे होते.
बुधवारी सकाळी सहा वाजून नऊ मिनीटांनी पाटण परिसरात भूकंपाचा धक्का जाणवला. या भूकंपाची तीव्रता २.०६ रिश्टर स्केल होती. या भूकंपाचा केंद्रबिंदू कोयनेपासून २३ किलोमीटर दूर वारणा खोऱ्यांत होता. या भूकंपाचा धक्का कोयना धरण परिसरात जाणवला नाही. तसेच १६ जानेवारीलाही दुपारी एकच्या सुमारास ३.३ रिश्टर स्केलचा भूकंप झाला होता.
कोयना, पाटणसह कऱ्हाड परिसरात या भूकंपाचा धक्का जाणवला होता. याचा केंद्रबिंदू वारणा खोऱ्यात जावळे गावच्या दक्षिणेला चार किलोमीटरवर होता. त्याची खोली नऊ किलोमीटर होती. तर दि. २१ रोजीही सकाळी साडेआकराच्या सुमारास ३.२ रिश्टर स्केलचा भूकंपाचा धक्का जाणवला होता. या भूकंपाचा धक्का कोयनेसह पाटण परिसरात जाणवला. याही भूकंपाचा केंद्रबिंदू वारणा खोऱ्यातील जावळे गावच्या दक्षिणेला १० किलोमीटर अंतरावर होता. त्याची खोली १४ किलो मीटर होती.