सातारा : नगरमधील शिवसैनिकांच्या हत्येच्या निषेधार्थ साताऱ्यात शिवसेनेचा मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2018 01:57 PM2018-04-09T13:57:33+5:302018-04-09T13:57:33+5:30
अहमदनगर येथील शिवसैनिकांच्या हत्येच्या निषेधार्थ सोमवारी शिवसेनेच्यावतीने पोवई नाका ते जिल्हाधिकारी कार्यालय असा मोर्चा काढून संबंधितांवर कडक कारवाईची मागणी केली.
सातारा : अहमदनगर येथील शिवसैनिकांच्या हत्येच्या निषेधार्थ सोमवारी शिवसेनेच्यावतीने पोवई नाका ते जिल्हाधिकारी कार्यालय असा मोर्चा काढून संबंधितांवर कडक कारवाईची मागणी केली.
जिल्हाप्रमुख चंद्रकांत जाधव यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. त्यामध्ये केडगाव, अहमदनगर येथील पोटनिवडणुकीच्या निकालाच्या दिवशी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची निघृण हत्या करण्यात आली. याप्रकरणी राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांना पोलिसांनी अटक केल्यानंतर चौकशीसाठी पोलीस अधिक्षक कार्यालयात आणण्यात आले.
दरम्यान, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी धक्काबुक्की करुन जगताप यांना नेले. या घटनेची गांभीर्याने दखल घेऊन आरोपींना फाशीची शिक्षा मिळावी. तसेच पोलीस अधीक्षक कार्यालयावर हल्ला करणाऱ्या कार्यकर्त्यांवर कडक कारवाई करावी. अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा यावेळी देण्यात आला.
मोर्चात उपजिल्हा प्रमुख हरीदास जगदाळे, तालुका प्रमुख दत्ता नलवडे, आकाश जाधव, स्वप्नील मुळीक, गिरीश सावंत, रमेश बोराटे, सचिन गायकवाड, बाळासाहेब शिंदे, सचिन जवळ, संभाजी शिंदे, शिवाजी पवार, सचिन जगताप व शिवसैनिक सहभागी झाले होते.