मराठी हौशी राज्य नाट्य स्पर्धेचे केंद्र साताऱ्यात व्हावे, उदयनराजे भोसलेंची मंत्री मुनगंटीवारांकडे मागणी

By सचिन काकडे | Published: August 29, 2023 06:17 PM2023-08-29T18:17:47+5:302023-08-29T18:19:18+5:30

सातारा : राज्याच्या सांस्कृतिक विभागाच्या वतीने दरवर्षी आयोजित करण्यात येणार्‍या मराठी हौशी राज्य नाट्य स्पर्धेचे केंद्र सातारा येथे सुरू ...

Satara should be the center of Marathi amateur state drama competition, MP Udayanraje Bhosale demand to Minister Mungantiwar | मराठी हौशी राज्य नाट्य स्पर्धेचे केंद्र साताऱ्यात व्हावे, उदयनराजे भोसलेंची मंत्री मुनगंटीवारांकडे मागणी

मराठी हौशी राज्य नाट्य स्पर्धेचे केंद्र साताऱ्यात व्हावे, उदयनराजे भोसलेंची मंत्री मुनगंटीवारांकडे मागणी

googlenewsNext

सातारा : राज्याच्या सांस्कृतिक विभागाच्या वतीने दरवर्षी आयोजित करण्यात येणार्‍या मराठी हौशी राज्य नाट्य स्पर्धेचे केंद्र सातारा येथे सुरू करावे, अशी मागणी खासदार उदयनराजे भोसले यांनी राज्याचे वन व सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे केली.

खासदार उदयनराजे यांनी मंगळवारी मंत्री मुनगंटीवार यांची मुंबई येथील निवासस्थानी भेट घेऊन त्यांना मागणीचे निवेदन दिले. तसेच भवानी तलवारीची प्रतिकृती भेट देऊन त्यांचे अनोख्या शैलीत स्वागतही केले. ही भेट नक्कीच मला नवी ऊर्जा आणि बळ प्रदान करेल, असा विश्वास यावेळी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला.

याप्रसंगी रंगकर्मी व सातारा नगरपालिकेचे माजी नगरसेवक कल्याण राक्षे, पंकज चव्हाण, सह्याद्री प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्रमिक गोजमगुंडे, काका धुमाळ, विनीत पाटील आदी उपस्थित होते.

Web Title: Satara should be the center of Marathi amateur state drama competition, MP Udayanraje Bhosale demand to Minister Mungantiwar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.