सातारा, सोलापूरला निधी कमी पडू देणार नाही; मुख्यमंत्र्यांनी खासदार रणजितसिंहांना दिली ग्वाही

By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2023 02:15 PM2023-02-15T14:15:21+5:302023-02-15T14:16:00+5:30

नसीर शिकलगार फलटण : फलटण तालुक्यासह सातारा व सोलापूर जिल्ह्याच्या विकास कामांना जी खीळ बसली होती, ती भरून काढून ...

Satara, Solapur will not let funds fall short; Chief Minister gave assurance to MP Ranjit Singh | सातारा, सोलापूरला निधी कमी पडू देणार नाही; मुख्यमंत्र्यांनी खासदार रणजितसिंहांना दिली ग्वाही

सातारा, सोलापूरला निधी कमी पडू देणार नाही; मुख्यमंत्र्यांनी खासदार रणजितसिंहांना दिली ग्वाही

googlenewsNext

नसीर शिकलगार

फलटण : फलटण तालुक्यासह सातारा व सोलापूर जिल्ह्याच्या विकास कामांना जी खीळ बसली होती, ती भरून काढून पुन्हा नव्या जोमाने विकासकामे सुरु करण्यासाठी आपले सरकार कटिबद्ध आहे. आगामी काळात याठिकाणच्या कोणत्याही प्रकल्पाला निधी कमी पडू देणार नाही अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना दिली. रखडलेल्या कामास मंजुरी दिल्याबद्दल खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेवून आभार मानले. यावेळी मुख्यमंत्र्यांनीही ग्वाही दिली.

सातारा जिल्ह्यातील खंडाळा, फलटण व सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस व सांगोला या तालुक्यातील कायमस्वरूपी दुष्काळी भाग ही ओळख आता पुसण्यासाठी निरा - देवधरच्या प्रकल्पाला मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे. यामुळे हा रखडलेला प्रकल्प आता मार्गी लागणार आहे. यासोबतच झिरपवाडी येथील शासकीय रुग्णालयाला निधी दिल्याबद्दल व फलटण येथे अतिरिक्त सत्र न्यायालयाच्या रखडलेल्या कामास मंजुरी दिल्याबद्दल खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेवून आभार व्यक्त केले. 

यावेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, महाविकास आघाडी सरकारने लोकहितार्थ असणारे बरेचसे प्रकल्प रखडवले होते. परंतु आताचे सरकार हे सर्वसामान्य जनतेचे सरकार आहे. यामध्ये सर्वसामान्य नागरिकांच्या हिताचे जे प्रकल्प असतील ते कोणतेही प्रकल्प रखडले जाणार नाहीत. आपले सरकार अतिशय खंबीर असून आगामी काळामध्ये सुद्धा नागरिकांच्या दृष्टीने महत्वाचे असलेले सर्व प्रकल्प मार्गी लावण्यात येतील सांगितले. 

Web Title: Satara, Solapur will not let funds fall short; Chief Minister gave assurance to MP Ranjit Singh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.