Lok Sabha Election 2019 साताऱ्यात दोन राजेंचे मनोमिलन अन् महायुतीचा कडवा विरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2019 11:19 PM2019-04-16T23:19:27+5:302019-04-16T23:19:58+5:30
सागर गुजर । लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : सातारा-जावळी विधानसभा मतदार संघात आचारसंहिता लागण्याआधी रोचक घडामोडी घडल्या. आमदार शिवेंद्रसिंहराजे ...
सागर गुजर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : सातारा-जावळी विधानसभा मतदार संघात आचारसंहिता लागण्याआधी रोचक घडामोडी घडल्या. आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी शिवसेनेचे विद्यमान उमेदवार नरेंद्र पाटील यांच्यासोबत बसून मिसळ खाल्ली होती. आता मात्र हेच शिवेंद्रसिंहराजे आपले बंधू उदयनराजे भोसले यांच्यासाठी मतदार संघात फिरत आहेत.
सातारा शहरात उदयनराजे भोसले यांच्या आघाडीची सत्ता आहे. तर शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या आघाडीला विरोधात बसावे लागले होते. मात्र दोन्ही आघाड्यांत पुन्हा मनोमिलन झाले असल्याने उदयनराजेंसाठी पोषक वातावरण निर्मिती होईल, अशी चिन्हे आहेत. तरीही अद्याप दोन्ही आघाड्यांच्या नगरसेवकांनी ज्या ताकदीने प्रचार करायला हवा, तो होताना दिसत नाही. आपल्या प्रचाराला उदयनराजे-शिवेंद्रसिंहराजे हवेत; मात्र त्यांच्यासाठी उन्हातान्हात फिरताना अंग चोरणारी मंडळीच पाहायला मिळत आहेत.
जावळी तालुक्यात शिवसेनेला पहिल्यापासूनच पोषक स्थिती आहे. मात्र शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दोन वेळा मताधिक्य घेऊन राष्ट्रवादीचे वातावरण तयार केले आहे. ते उदयनराजेंसाठी पोषक ठरणारे आहे.
युती । प्लस पॉर्इंट काय आहेत?
सातारा नगरपालिकेच्या सत्तेत भाजपने शिरकाव केला आहे. भाजपचे ६ नगरसेवक आहेत. जिल्हा परिषदेलाही दोन गटांत भाजपने वर्चस्व मिळवले होते. जावळीतही भाजपमध्ये इनकमिंग झाले.
युती । विक पॉर्इंट काय आहेत?
या मतदार संघात शिवसेना-भाजप एकसंध दिसत नाही. वरिष्ठ पातळीवर युती झाली असली तरी एकोप्याने निवडणूक लढण्यासाठी जे घट्ट बंध पाहिजेत, ते दिसत नाहीत. रिपाइंची भूमिकाही गुलदस्त्यात आहे.
आघाडी । प्लस पॉर्इंट काय आहेत?
सातारा-जावळी विधानसभा मतदार संघात राष्ट्रवादीचे आमदार आहेत. जिल्हा परिषद, पंचायत समिती तसेच पालिकांतील सत्तेचा फायदा आघाडीच्या उमेदवाराला होऊ शकतो.
आघाडी । विक पॉर्इंट काय आहेत?
शहरातील सत्तेत राष्ट्रवादीचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची आघाडी विरोधात आहेत. उदयनराजेंच्या प्रचारासाठी नगरविकास आघाडी अंग झाडून कामाला लागल्याचे दिसून येत नाही.