साताऱ्याचा डंका चांद्यापासून बांद्यापर्यंत !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2019 11:21 PM2019-05-19T23:21:13+5:302019-05-19T23:21:18+5:30

नितीन काळेल । लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : सातारा जिल्ह्यातील यशस्वी ठरलेल्या विविध प्रकल्प आणि योजनांना राज्यातील एक-दोन नव्हे ...

Satara Starcha from Chandra to Bandya! | साताऱ्याचा डंका चांद्यापासून बांद्यापर्यंत !

साताऱ्याचा डंका चांद्यापासून बांद्यापर्यंत !

Next

नितीन काळेल ।
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : सातारा जिल्ह्यातील यशस्वी ठरलेल्या विविध प्रकल्प आणि योजनांना राज्यातील एक-दोन नव्हे तर आतापर्यंत १३ जिल्ह्यांच्या पथकाने भेट देत माहिती घेतलीय. यामध्ये भंडाºयापासून सिंधुदूर्गपर्यंतच्या अनेक जिल्ह्यांचा समावेश आहे. त्यामुळे साताºयाचा हा डंका चांद्यापासून बांद्यापर्यंत पोहोचल्यातच जमा आहे.
सातारा जिल्हा परिषदेने गेल्या काही वर्षांत विविध उपक्रम, अभियानाच्या माध्यमातून देशभर नावलौकिक केला आहे. राज्य आणि केंद्र शासनाच्या ही विविध योजना यशस्वी करून डंका निर्माण केलाय. तर अवघ्या आठ महिन्यांपूर्वी साताºयाने स्वच्छतेत देशात प्रथम क्रमांक मिळविलेला. आता तर जिल्हा परिषदेतील सर्व विभाग व परिसरही सौरऊर्जेवर उजळणार आहे. सातारा ही राज्यातील पहिलीच जिल्हा परिषद सौरऊर्जेचा वापर करणारी ठरू शकते. अशा या जिल्ह्यातील विविध यशस्वी प्रकल्प पाहण्यासाठी राज्यातील विविध जिल्ह्यांची पथके भेट देत आहेत.
कोल्हापूर, सांगली, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, अमरावती, वर्धा, जळगाव, नाशिक, चंद्रपूर, धुळे, भंडारा व वाशिम या जिल्ह्यातील पथकांनी साताºयाला भेट दिली. तर काही दिवसांपूर्वीच जालना जिल्ह्यातीलही पथक जिल्ह्याच्या भेटीवर आले होते. या पथकांनी सातारा तालुक्यातील नागठाणे गावातील आदर्श घनकचरा व्यवस्थानाची पाहणी केली. तसेच सुका व ओल्या कचºयाचे वर्गीकरण करणे, त्यापासून खत तयार कसे करण्यात येते, याची सविस्तर माहिती घेतली. त्याचबरोबर कºहाड तालुक्यातील बनवडीलाही भेट देत तेथील घनकचरा व्यवस्थानाबद्दल अधिक माहिती जाणून घेतली. पाटण तालुक्यातील आदर्श गाव मान्याचीवाडीलाही भेट देण्यात आली. अनेक योजना आणि उपक्रमांत या गावाने आपली ओळख निर्माण केलीय. या गावालाही पथकाने भेट देत माहिती घेतली. साताºयातील अशा गावांचा आदर्श घेऊनच राज्यातून भेटीसाठी आलेल्या जिल्ह्यांनी काम सुरू केले आहे. साताºयातील आदर्श गावातील व्यवस्थापनाचे धडे इतर जिल्हे व गावे गिरवणार आहेत. हे जिल्ह्यासाठी निश्चितच गौरवास्पद आहे.
नागठाणे

आदर्श घनकचरा व्यवस्थापन
ओला व सुक्या कचºयासाठी वाहन व्यवस्था
ओल्या कचºयापासून गांडूळ खत निर्मिती
सुक्या कचºयातील प्लास्टिक गोळा करून विक्री
दीड वर्षात गांडूळ खताची साडेतीन लाखांची विक्री
गाव कचरामुक्त व ग्रामस्थांना स्वच्छतेची सवय
गावातील दुर्गंधी संपण्यास मदत
शेतकऱ्यांकडून सेंद्रीय शेतीस चालना

बनवडी
गावात २४ बाय ७ नळपाणीपुरवठा योजना
मीटरद्वारे ग्रामस्थांना पाणीपुरवठा
आदर्शवत सांडपाणी प्रकल्प कार्यान्वित
गांडूळ खताची ३५ टन निर्मिती
सांडपाणी प्रकल्पावर दीड एकरवर केळीची बाग
ओला व सुका कचरा गोळा करण्यासाठी स्वतंत्र वाहने

आठ हजार जणांची भेट
गेल्या काही वर्षांत १३ जिल्हे आणि ५४० गावे, संस्था आणि शाळांनी सातारा जिल्ह्यातील विविध गावांना भेट देत आदर्श कामांची माहिती घेतलीय. या अंतर्गत भेट देणाºयांची संख्या जवळपास ८ हजार इतकी आहे. भेट देणाºयांनी आपले गाव आणि जिल्ह्यात साताºयाप्रमाणे काम सुरू केले आहे.

Web Title: Satara Starcha from Chandra to Bandya!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.