सातारा : गतिरोधकावरून पडून जखमी झालेले कदम पैशाअभावी उपचारापासून वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2018 05:10 PM2018-03-16T17:10:14+5:302018-03-16T17:10:14+5:30

कवठे येथे गतिरोधकावरून पडून गंभीर जखमी झालेले चंद्रकांत काकडे यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते, परंतु गंभीर इजा व मेंदूला मार बसल्याने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. बिकट आर्थिक परिस्थिती व हातावरचे पोट असल्याने काकडे यांच्यावर शस्त्रक्रिया होऊ शकलेली नाही.

Satara: The steps taken by the deadlock and deprived of money due to money laundering | सातारा : गतिरोधकावरून पडून जखमी झालेले कदम पैशाअभावी उपचारापासून वंचित

सातारा : गतिरोधकावरून पडून जखमी झालेले कदम पैशाअभावी उपचारापासून वंचित

Next
ठळक मुद्देगतिरोधकावरून पडून जखमी झालेले कदम पैशाअभावी उपचारापासून वंचितग्रामस्थांमधून संताप, गरिबाच्या संसाराची माती केल्याचा आरोप

कवठे : कवठे येथे गतिरोधकावरून पडून गंभीर जखमी झालेले चंद्रकांत काकडे यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते, परंतु गंभीर इजा व मेंदूला मार बसल्याने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. बिकट आर्थिक परिस्थिती व हातावरचे पोट असल्याने काकडे यांच्यावर शस्त्रक्रिया होऊ शकलेली नाही.

पै-पाहुणे व काही ग्रामस्थांनी केलेल्या मदतीवर आत्तापर्यंत दवाखान्यासाठी सत्तर हजार रुपये खर्च केले. मात्र, चंद्रकांत काकडे अद्याप शुद्धीवर आलेले नाहीत. डॉक्टर शस्त्रक्रियेची गरज असल्याचे सांगत असून यासाठी दीड लाख ते दोन लाख रुपये खर्च होण्याची शक्यता वर्तविली आहे.

काकडे कुटुंबाकडे आर्थिक तरतूद नसल्याने हे कुटुंब कोणताही शस्त्रक्रियेचा निर्णय घेऊ शकत नाहीत. त्यामुळे शस्त्रक्रियेविनाच संपूर्ण दिवस अति दक्षता विभागात काकडे यांना ठेवण्यात आले.

महामार्गावरील सेवा रस्त्यावर गतीरोधक हे वाहनांचे वेग नियंत्रित करण्यासाठी केले जातात. परंतु हेच गतिरोधक काकडे कुटुंबाच्या वाताहातीस कारणीभूत ठरले आहेत. दुसऱ्याच्या ट्रकवर चालकाची हंगामी नोकरी करून काकडे कशीबशी गुजराण करीत असताना कुटुंबाचा कर्ता माणूसच जायबंदी झाल्याने कुटुंबाची वाताहात होत असून याला जबाबदार कोण? असा प्रश्न ग्रामस्थांना पडला आहे.

Web Title: Satara: The steps taken by the deadlock and deprived of money due to money laundering

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.