सातारा : अंगापूरवंदन मध्ये जिलेटीन, डिटोनेटरचा साठा जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 5, 2018 01:15 PM2018-11-05T13:15:55+5:302018-11-05T13:16:47+5:30
सातारा : अंगापूर वंदन येथे रविवारी रात्री बेकायदा जिलेटीन कांड्या व डिटोनेटर आदी स्फोटकजन्य पदार्थ बाळगल्याप्रकरणी सातारा तालुका पोलिसांनी ...
सातारा : अंगापूर वंदन येथे रविवारी रात्री बेकायदा जिलेटीन कांड्या व डिटोनेटर आदी स्फोटकजन्य पदार्थ बाळगल्याप्रकरणी सातारा तालुका पोलिसांनी तिघांना अटक केली. त्यांच्याकडून ३ लाख ४१ हजार रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला.
याबाबत माहिती अशी की, सातारा तालुक्यातील अंगापूर वंदन येथे एकजण बेकायदा स्फोटकजन्य पदार्थ बाळगत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार सातारा तालुक्याचे पोलीस उपनिरीक्षक शामराव चव्हाण यांच्या पथकाने अंगापूर येथील सोमनाथ कणसे यांच्या सामुदायिक विहिरीवर छापा टाकला.
यावेळी अविनाश राजेंद्र जाधव (वय २७), बाजीराव शंकर जाधव (२९), मारुती तानाजी जाधव (२१ सर्व रा. अंगापूर) यांना अटक केली. त्याच्याकडे ट्रॅक्टरमध्ये १७२ जिलेटीन कांड्या, ९९ नग डिटोनेटर आदी स्फोटकजन्य पदार्थांचा ३ लाख ४० हजार ९३० रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला. याप्रकरणी रविवारी रात्री उशिरा सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.