सातारा : प्राध्यापकांच्या संपामुळे वर्गात डुलक्या -महाविद्यालयात विद्यार्थ्यांची संख्या रोडावली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2018 02:09 PM2018-09-28T14:09:15+5:302018-09-28T14:11:29+5:30
प्राध्यापकांच्या संपामुळे सध्या महाविद्यालयात विद्यार्थ्यांची संख्या रोडावली आहे. एखादं लेक्चर होईल म्हणून महाविद्यालयात प्रवास करून येणाºया विद्यार्थ्यांची दैना होत आहे.
सातारा : प्राध्यापकांच्यासंपामुळे सध्या महाविद्यालयात विद्यार्थ्यांची संख्या रोडावली आहे. एखादं लेक्चर होईल म्हणून महाविद्यालयात प्रवास करून येणाºया विद्यार्थ्यांची दैना होत आहे. वर्गात शिकवायला प्राध्यापक येत नसल्यामुळे वर्गातच डुलक्या काढण्याचे प्रकार घडत आहेत.
उच्च शिक्षणातील भरती बंदी आदेश रद्द करावा, सातवा वेतन आयोग लागू करावा, यासह विविध मागण्यांसाठी एमपुक्टोच्या वतीने प्राध्यापकांचा संप सुरू आहे. जिल्ह्यातील रयत शिक्षण संस्था, स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था यांच्यासह इतर संस्थांचे प्राध्यापक या संपात सहभागी आहेत. सर्वच महाविद्यालयांतील वरिष्ठ वर्गातील शिकवणं थांबल्यामुळे विद्यार्थ्यांना वर्गात बसून डुलक्या काढण्याशिवाय पर्याय नाही.