साताऱ्याचे पोलीस अधीक्षक समीर शेख यांना केंद्रीय गृहमंत्र्यांचे पदक जाहीर
By दत्ता यादव | Published: October 31, 2022 01:38 PM2022-10-31T13:38:50+5:302022-10-31T14:22:12+5:30
महाराष्ट्रातील दोन पोलीस अधीक्षकांसह एकूण ११ जणांचा समावेश आहे.
सातारा: नूतन जिल्हा पोलीस अधीक्षक व गडचिरोलीचे तत्कालीन सहाय्यक पोलीस अधीक्षक समीर शेख यांना ‘केंद्रीय गृह मंत्र्याचे २०२२ चे विशेष ऑपरेशन पदक’ जाहीर झाले आहे. देशभरातील अनेक पोलिस अधिकारी व कर्मचारी यांना हे पदक जाहीर झाले असून, महाराष्ट्रातील दोन पोलीस अधीक्षकांसह एकूण ११ जणांचा समावेश आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख यांची गेल्याच आठवड्यात गडचिरोली येथून साताऱ्यात बदली झाली आहे. गडचिरोली येथे त्यांच्या नेतृत्वाखाली अनेक धाडसी कारवाई झाल्याने त्यांना या पदकाने सन्मानित करण्यात येणार आहे.