कोरोना रुग्णांत सातारा तालुका अव्वल!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2021 04:59 AM2021-02-23T04:59:05+5:302021-02-23T04:59:05+5:30

सातारा : कोरोना संकटाला ११ महिने झाले असून, जिल्ह्यात आतापर्यंत ५८ हजार रुग्ण आढळून आले आहेत. यामधील सर्वाधिक १४ ...

Satara taluka tops in corona patients! | कोरोना रुग्णांत सातारा तालुका अव्वल!

कोरोना रुग्णांत सातारा तालुका अव्वल!

Next

सातारा : कोरोना संकटाला ११ महिने झाले असून, जिल्ह्यात आतापर्यंत ५८ हजार रुग्ण आढळून आले आहेत. यामधील सर्वाधिक १४ हजारांवर रुग्णांची नोंद सातारा तालुक्यात आहे, तर कऱ्हाड तालुक्यात ११ हजारांवर रुग्ण नोंद झाले आहेत. त्याचबरोबर या दोन तालुक्यातच कोरोनाने सर्वाधिक नागरिकांचा बळी गेला आहे.

जिल्ह्यात मार्च महिन्यापासून कोरोनाचे संकट सुरू आहे. सुरुवातीला हाताच्या बोटावर मोजण्याइतपत रुग्ण सापडत होते. मात्र, जून महिन्यानंतर कोरोना रुग्णवाढीचा वेग वेगाने वाढला. जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात तर कोरोनाचे दररोज ५०० ते ८००, ९०० दरम्यान रुग्ण वाढत होते. एका दिवसात हजार रुग्ण नोंद झाल्याचेही दिसून आले. पण, ऑक्टोबर महिना सुरू झाल्यानंतर कोरोना वाढीचा वेग काहीसा मंदावला. कधी १००, २०० फारतर ३०० पर्यंत दिवसाला रुग्ण आढळले. जानेवारी अखेरपर्यंत तरी ५०, ६० च्याही खाली रुग्ण आढळून येत होते. त्यामुळे कोरोना नियंत्रणात आला, असे वाटू लागलेले; पण, फेब्रुवारीपासून बाधितांची संख्या वाढली.

सध्यस्थितीत जिल्ह्यात ५८ हजार रुग्णसंख्या नोंद झाली आहे. सातारा तालुक्यात १४ हजार ६९ कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. यानंतर कऱ्हाड तालुक्यात ११ हजार ७४ रुग्णांची नोंद झाली; तर सातारा तालुक्यात कोरोनाने ४६६ आणि कऱ्हाडला ३४१ जणांचा बळी गेल्याची नोंद झालेली आहे.

इतर तालुक्यातही कोरोना रुग्णांचे प्रमाण वाढल्याचे दिसून येत आहे. मात्र, यामध्ये महाबळेश्वर तालुका पाठीमागे असून, यामुळे प्रशासनाला दिलासा आहे. जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनामुळे १ हजार ८४१ जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये सर्वाधिक मृत्यूची नोंद ही सातारा तालुक्यातच झाली आहे. यानंतर कऱ्हाड तालुक्याचा क्रमांक लागतो.

चौकट :

तालुकानिहाय नोंद कोरोना आकडेवारी

तालुका बाधित मृत

सातारा - १४०६९ ४६६

कऱ्हाड - ११०७४ ३४१

फलटण - ५८५३ १७२

कोरेगाव - ४९३४ १६४

वाई - ४१८५ १४३

खटाव - ४३९४ १५४

खंडाळा - ३३२१ ७४

जावळी - २७३८ ६५

माण - २९०० ११४

पाटण - २२८२ ११९

महाबळेश्वर - १३५८ २६

जिल्ह्याबाहेरील - ७२९ ०३

.....................................................

Web Title: Satara taluka tops in corona patients!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.