साताऱ्याचे तापमान १३ अंशाखाली., थंडीत पुन्हा वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2020 01:17 PM2020-11-10T13:17:38+5:302020-11-10T13:22:14+5:30

Winter, sataranews, Mahabaleshwar Hill Station, Winter Session Maharashtra, Satara area सातारा जिल्ह्यात थंडी वाढत असतानाच किमान तापमानात सतत चढ-उतार सुरू आहे. त्यामुळे वातावरणात फरक होऊ लागला आहे. कधी थंडी तर कधी कोवळे ऊनही जाणवते. रविवारी सकाळी साताºयातील तापमान १८.०८ अंश तर सोमवारी १५.०७ नोंदले गेले. त्याचबरोबर मंगळवारी १३ अंशाच्या खाली आल्याने थंडीत वाढ झाली.

Satara temperature drops below 13 degrees. Cold rises again: Minimum temperature fluctuations continue | साताऱ्याचे तापमान १३ अंशाखाली., थंडीत पुन्हा वाढ

साताऱ्याचे तापमान १३ अंशाखाली., थंडीत पुन्हा वाढ

googlenewsNext
ठळक मुद्देसाताऱ्याचे तापमान १३ अंशाखाली., थंडीत पुन्हा वाढ किमान तापमानात चढ-उतार सुरूच

सातारा : जिल्ह्यात थंडी वाढत असतानाच किमान तापमानात सतत चढ-उतार सुरू आहे. त्यामुळे वातावरणात फरक होऊ लागला आहे. कधी थंडी तर कधी कोवळे ऊनही जाणवते. रविवारी सकाळी साताऱ्यातील तापमान १८.०८ अंश तर सोमवारी १५.०७ नोंदले गेले. त्याचबरोबर मंगळवारी १३ अंशाच्या खाली आल्याने थंडीत वाढ झाली.

यावर्षी आॅक्टोबर महिन्याच्या मध्यापर्यंत पाऊस सुरू होता. त्यानंतरही काही भागात तुरळक प्रमाणात पाऊस पडला. परिणामी यंदा थंडी पडण्यास थोडा उशीर झाला. मागील काही दिवसांपासून तर जिल्ह्याच्या किमान तापमानात सतत उतार येत चालला होता. त्यामुळे हळू-हळू थंडी वाढण्यास सुरुवात झाली. मात्र, पुन्हा किमान तापमान वाढत चालले आहे.

सातारा शहरातील किमान तापमान शुक्रवारी सकाळी १४.०९ अंशापर्यंत खाली आले होते. तर रविवारी सकाळी १८.०८ अंश सेल्सिअस नोंदले गेले. दोन दिवसांत जवळपास चार अंशाने किमान तापमान वाढले. त्यामुळे थंडी कमी झाली. त्यातच रविवारच्या तुलनेत सोमवारी सकाळी साताऱ्यातील किमान तापमान १५.०७ अंशावर आले. त्यामुळे थंडीत वाढ झाली. असे असतानाच मंगळवारी आणखी किमान तापमान उतरले.

साताऱ्यात १२.०८ अंश तापमानाची नोंद झाली. त्यामुळे थंडीत पुन्हा वाढ झाली आहे. तर सध्या थंडी सुरू झाल्याने पहाटे फिरणारे नागरिक उबदार कपड्यांचा वापर करत आहेत.


साताऱ्यातील किमान तापमान असे...

  • दि. १ नोव्हेंबर १९.०२
  • दि. २ नोव्हेंबर १९.०८
  • दि. ३ नोव्हेंबर १७.०४
  • दि. ४ नोव्हेंबर १६.०५
  • दि. ५ नोव्हेंबर १५.०६
  • दि. ६ नोव्हेंबर १४.०९
  • दि. ७ नोव्हेंबर १६.००
  • दि. ८ नोव्हेंबर १८.०८
  • दि. ९ नोव्हेंबर १५.०७
  • दि. १० नोव्हेंबर १२.०८

 

Web Title: Satara temperature drops below 13 degrees. Cold rises again: Minimum temperature fluctuations continue

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.