सातारा : मंदिराचे कुलूप तोडून चांदीच्या मूर्ती चोरी, दानपेटीही फोडली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2018 04:15 PM2018-06-25T16:15:36+5:302018-06-25T16:16:09+5:30
सदरबाझार येथील पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिराचे कुलूप तोडून चोरट्यांनी देवाच्या पितळीच्या व चांदीच्या मूर्ती तसेच दानपेटीतील रोकड लंपास केली. सोमवारी सकाळी उघडकीस आलेल्या या घटनेमुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे.
सातारा : सदरबाझार येथील पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिराचे कुलूप तोडून चोरट्यांनी देवाच्या पितळीच्या व चांदीच्या मूर्ती तसेच दानपेटीतील रोकड लंपास केली. सोमवारी सकाळी उघडकीस आलेल्या या घटनेमुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, सदरबझार येथील अजिंक्य कॉलनी येथे असलेल्या पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिराचे रविवारी रात्री चोरट्यांनी कुलूप तोडले. या मंदिरात प्रवेश करून त्यांनी मंदिरातील नंदिश्वर, आदिनाथ, परसनाथ, पंचपरममेली या देवांच्या पितळी आणि चांदीच्या मूर्ती चोरल्या. तसेच दानपेटीचे कुलूप तोडून त्यातील १५ हजारांची रोकडही लंपास केली.
श्रेत्रिक सुभाष शेट्टी (रा. अशोक पार्क, सदरबझार) यांनी या घटनेची फिर्याद दिली आहे. याप्रकरणी सातारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक नारायण सारंगकर करीत आहेत.